Home | Business | Auto | India Debut Of Maruti Suzuki All-New Swift At Auto Expo 2018

28km चे मायलेज देणारी मारुती Swift, असे आहे या कारचे फीचर्स आणि किंमत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 23, 2018, 06:44 PM IST

मारुती स्विफ्ट स्टायलीश लुक आणि फिचर्ससोबत ऑटो एक्स्पो 2018 मध्ये लाँच होण्यासाठी तयार आहे.

 • India Debut Of Maruti Suzuki All-New Swift At Auto Expo 2018

  युटिलिटी डेस्क:- मारुती स्विफ्ट स्टायलीश लुक आणि फिचर्ससोबत ऑटो एक्स्पो 2018 मध्ये लाँच होण्यासाठी तयार आहे. मारुती सुझुकीचे सिनियर एक्झीकेटिव्ह डायरेक्टर (मार्केटिंग आणि सेल्स) आर. एस. कल्सी यांनी सांगीतले की, "ऑल-न्यू स्विफ्ट आपल्या स्टायलीश डिझाइन, अॅडव्हांस टेक्नॉलॉजी, दमदार परफॉर्मेंसच्या प्रिमियर कॅटेगरी असणाऱ्या कारला चॅंलेज देणार आहे. कंपनीने या कारची प्री-बुकिंग सुरु केली आहे आण ऑटो एक्सपो 2018 मध्ये लाँच केली जाणार आहे.

  या फिचर्सने असेल खास
  1. स्पोर्टी अणि दमदार लुक
  2. मजबूत बॉडी सेक्शन आणि एयरोडायनामिक काऊंटर्स
  3. 5th जनरेशन हार्टेक्ट प्लॅटफॉर्म
  4. ईजी ड्राइव्ह टेक्नोलॉजी


  21 व्हेरिएंटमध्ये होईल लाँच
  नवीन मारुती स्विफ्ट पूर्ण 12 व्हेरिएंटमध्ये मिळणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन असणारे मॉडेलही सामिल असेल. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये लाँच होणार आहे. स्विफ्टमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाईल. इंजिन 6,000 Rpm वर 83 पीएसचे पॉवर आणि 4,200 Rpm वर 113 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. डिझेल मॉडेलमध्ये 1.3 लीटर मल्टीजेट इंजिन लावले आहे. हे इंजिन 2,000 वर 190 nm टॉर्क जनरेट करते. सोबतच 4,000 Rpm वर 75 पीएस पावर देते. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 5 स्पीड गेअरबॉक्सने सज्ज आहे.

  दमदार मायलेज
  मिडिया सपोर्टनुसार, 28 किलोमीटर प्रती लीटरचे मारलेज देणार आहे. याचे सुरुवातीचे मॉडेल LXi/LDi तेथेच टॉप मॉडेल ZXi/ZDi असेल. अता फक्त 11 हजार रुपये देऊनही प्री-बुकिंग करु शकतात. रिपोर्ट्सनुसार याची किंमत 5 ते 8 लाखापर्यंत असेल.

  पुढील स्लाइडवर पाहा मारुती स्विफ्टचे काही फोटोज...

 • India Debut Of Maruti Suzuki All-New Swift At Auto Expo 2018
 • India Debut Of Maruti Suzuki All-New Swift At Auto Expo 2018
 • India Debut Of Maruti Suzuki All-New Swift At Auto Expo 2018
 • India Debut Of Maruti Suzuki All-New Swift At Auto Expo 2018
 • India Debut Of Maruti Suzuki All-New Swift At Auto Expo 2018

Trending