Home | Business | Auto | new suv launches in india 2018

यंदा लाँच होतील या 5 नव्या SUV कार, किंमत 6 लाखांपासून सुरू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2018, 02:44 PM IST

2017 साल हे युटिलीटी कारसाठी विषेश राहिले आहे. टोटर पॅंसेजर कारच्या सेल्समध्ये सर्वात अधिक वाढ ही यूटिलीटी व्हिकस्लमध्य

 • new suv launches in india 2018

  नवी दिल्ली - 2017 हे वर्ष ऑटोमोबाईल उद्योगासाठी विषेश राहिले आहे. टोटल पॅंसेजर कारच्या सेल्समध्ये सर्वात अधिक वाढ ही युटिलिटी वाहनांमध्ये झाली आहे. टाटा मोटर्स, जीप सारख्या कारने त्यांच्या नव्या मॉडल्सने मार्केटमध्ये कॉम्पिटीशन लेव्हल वाढवली आहे. हे पाहता 2018 मध्येही कार सेंगमेंटमध्ये नवीन मॉडेल लाँच करणार आहे. 2018 या वर्षात मारूती सुझुकी इंडिया, ह्युंडाई, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि डॅटसन यांच्याकडून सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच करण्यात येणार आहे.

  मारूती ब्रीझा पेट्रोल..
  मारुती सुझूकीची विटारा ब्रीझा ही भारतामध्ये सर्वात अधिक विकणारी SUV आहे यामध्ये काही शंकाच नाही. पण हे मॉडेल आतापर्यंत फक्त डिझेल इंजीनमध्येच उपलब्ध आहे. मारूती सुझुकी यावर्षी पेट्रोल व्हर्जनही लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये 1.2 लीटर इंजीन असू शकेल.

  अंदाजे किंमत - 6 ते 7 लाखांपर्यंत...

  पुढील स्लाईडवर वाचा, महिंद्रा TUV300 Plus या कारबद्दल...

 • new suv launches in india 2018

  महिंद्रा TUV300 Plus

  महिंद्रा कंपनीकडून 2018 च्या सुरूवातीला TUV300 Plus या कारला लॉन्च करण्यात येणार आहे. या करचे टेस्टिंग जगभरात पूर्ण झाले आहे. या कारचे स्पेसीफीकेशनही लीक झाले आहे. असे मानले जात आहे ही ही कार 9 सीटर असेल आणि 2.2 लीटर mHawk120 डीझल इंजन असेल.

  अंदाजे किंमत- 8 ते 12 लाख रुपये..

 • new suv launches in india 2018

  ग्रो क्रॉस

  डॅट्सन कडून या वर्षी 2018 च्या सुरू सुरुवातीला क्रॉस कॉन्सेप्टला सादर केले जाऊ शकते. या कारला गो प्ससच्या आधारे बनवले गेले आहे.  अंदाजे किंमत - 6 ते 8 लाख रुपये.

 • new suv launches in india 2018

  ह्युंदाई क्रेटा फॅसेलिफ्ट
  देशातील दूसरी सर्वात अधिक विकणारी SUV ह्युंदाई क्रेटा आहे. क्रेटा कार ही भारतात 2015 मध्ये लॉन्च झाली आहे. जेव्हा क्रेटाला लॉन्च केले होते तेव्हा SUV सेगमेंटमध्ये टॉपवर होती पण, ब्रीझा कार आल्यानंतर SUV ची पोझीशन दुसऱ्या क्रमांकावर गेली. ह्युंदाई आपली पोझीशन मजबूत करण्यासाठी क्रेटाच्या फेसलिफ्ट व्हर्जनला लॉन्च करणार आहे. 

  अंदाजे किंमत - 9.30 ते 14.50 लाख रूपये

 • new suv launches in india 2018

  टाटा Q501
  टाटा मोटर्ससाठी वर्ष 2017 हे अधिक शानदार ठरले आहे. कंपनीकडून पहिली कॉम्पेक्ट SUV नेक्सॉनला लॉन्ट केले आहे. याव्यतीरीक्त कंपनीने हेक्सालाही लॉन्च केले आहे. या दोन्ही कारच्या वजनापेक्षाही SUV सेंगमेंटमध्ये अधिक मजबूत आहे.  हे प्रिमियम SUV असेल ज्याला लॅंन्ड रोव्हर फ्रीलेंडर 2 प्लॅटफॉर्मवर बनवले जात आहे. असे मानले जाते की या कारला 5 आणि 7 सीटर दोन्ही ऑप्शन उपलब्ध असेल.

  अंदाजे किंमत - 15 ते 20 लाख रूपये

Trending