Home | Business | Auto | Mahindra announced New bikes under International Jawa Brand

Royal Enfield ला टक्कर द्यायला परत येतेय Jawa, याच वर्षी बाजारात उतरणार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 03, 2018, 04:44 PM IST

आयकॉनि‍क Jawa मोटरसायकल्‍स भारतात महिंद्रा ग्रुप लाँच करणार आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली.

 • Mahindra announced New bikes under International Jawa Brand

  नवी दि‍ल्‍ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नुकतेच ट्वीट करून भारतात Jawa ब्रँड लवकरच येणार असल्याची घोषणा केली. आयकॉनि‍क Jawa मोटरसायकल्‍स भारतात महिंद्रा ग्रुप लाँच करणार आहे. आनंद महिंद्रा यांनी नव्या Jawa बाईक्स कधीपर्यंत बाजारात येणार याबाबत निश्चित माहिती दिली नाही. त्यांनी नव्या मोटारसायकल लवकरच येणार असल्याचे ट्वीट केले. त्याशिवाय एका ट्वीटमध्ये त्यांनी नवीन बाईक याचवर्षी येणार असे म्हटले.

  Jawa ची स्पर्धा भारतात Royal Enfield बरोबर
  ट्वि‍टरवर एका फॉलोअरने महिंद्रा यांना म्हटले की, ते दोन वर्षांपासून Jawa ची वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी रॉयल एनफील्‍डही खरेदी केली नाही. त्यांनी ट्वीटरवर विचारले की, नवी Jawa बाइक 2018 मध्ये येईल की नाही. त्यावर महिंद्रा यांनी उत्तर दिले की, हे याच वर्षी होणार आहे. मात्र त्यांनी याबाबत फार माहिती दिली नाही. ही बाईक सणांच्या काळात 2018 च्या अखेरीस लाँच होऊ शकते.


  ब्रँड यूझ करण्याचा महिंद्राकडे अधिकार
  महिंद्राने क्‍लासि‍क लेजेंडद्वारे चेक रिपब्लिकची मोटरसायक‍ल कंपनी जावाबरोबर 'एक्‍सक्‍लुसिव्ह ब्रँड लाइसन्सिंग अॅग्रिमेंट' वर साइन केले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, महिंद्राने क्‍लासि‍क लेजेंड खरेदी केले आहे. त्यांच्याकडे BSA चे संपूर्ण शेअर आहेत. त्याशिवाय क्‍लासि‍क लेजेंडकडे जावाबरोबरच लायसन्सिंग अॅग्रिमेटही आहे. म्हणजे महिंद्राकडे हे ब्रँड्स वापरण्याचे अधिकार आहेत.

  पुढे वाचा.. आधीही मिळाले संकेत..

 • Mahindra announced New bikes under International Jawa Brand

  आधीही दिले संकेत.. 
  महिंद्राचे एमडी पवन गोयंका यांनी गेल्यावर्षी म्हटले होते की, टू-व्‍हीलर बिझजनेस महिंद्रा अँड महिंद्रामध्ये डीमर्ज्‍ड झाला आहे. हा बिझनेस सध्याच्या प्रोडक्‍ट रेंजसह पुढे जाईल. आम्ही तोटा अगदी कमी केला आहे. सध्या आम्ही Peugeot स्‍कूटर्सचा विचार थांबवला आहे. पण आम्ही जावा ब्रँड आगामी आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत लाँच करणार आहोत. 
   

  पुढे वाचा, कुठे होणार उत्पादन.. 


   

 • Mahindra announced New bikes under International Jawa Brand

  याठिकाणी हॉोणार उत्पादन... 
  जावा ब्रँडखाली नव्या प्रोडक्ट्सचे डिझाइन आणि इंजिनीअरींगसाठी महिंद्राच्या ग्‍लोबल कॅपेसि‍टीबरोबरच इटलीतील महिंद्रा रेसिंगच्या टेक्‍नि‍कल डेव्हलपमेंट सेंटरच्या तज्ज्ञांची मदतही मिळेल. त्यामुळे आयकॉनि‍क ब्रँडच्या नव्या प्रोडक्‍ट्सच्या लाँचिंग आणि डिझायनिंगमध्ये मदत मिळेल. जावा मोटरसायकल्सचे प्रोडक्शन कंपनीच्या पीथमपूर प्लान्टमध्ये होईल. त्याच्या मदतीने महिंद्राला या प्रोडक्ट्सच्या किमती चांगल्या ठेवता येतील. 


  पुढे वाचा.. अशी असेल नवी बाईक 

   

 • Mahindra announced New bikes under International Jawa Brand

  जावाची नवी बाईक 
  जावाने त्यांची नवी बाईक 2018 जावा 350 स्‍पेशल को युरोपात लाँच केली आहे. युरोपातील ही तिसरी जावा बाईक आहे. यापूर्वी कंपनीने जावा 350 OHC आणि जावा 660 विंटेज सादर केली होती. महिंद्राने क्‍लासि‍क लेजेंड प्राइवेट लि‍. मध्ये 60 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. अशा परिस्थितीत ही बाईक भविष्यात भारतात येऊ शकते. 

Trending