Home | Business | Auto | reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank

सर्वात श्रीमंत भारतीयाची कार, जणू कार नव्हे रणगाडाच

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 26, 2017, 11:20 AM IST

बीएमडब्ल्यू 760 एलआयमध्ये करण्यात आलेल्या मॉडिफिकेशन्समुळे ही जगातील सुरक्षित कार ठरली आहे.

 • reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank

  मुंबई - येत्या काही वर्षात सर्व कार सेफ्टी फिचर्स असल्याशिवाय रस्त्यावर उतरणार नाहीत. किंमतीनुसार कारमध्ये असलेल्या सेफ्टी फिचर्समध्ये बदल होत जातो. मात्र, काहीजण आपल्या गरजेनुसार सेफ्टी फिचर्स अपग्रेड करून घेतात. भारतातील सर्वात श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे बीएमडब्ल्यू 760 ही कार आहे. ही कार सर्वाधिक सेफ मानली जाते. या कारमध्ये अनेक मॉडिफिकेशन करण्यात आले. त्यामुळे या कारची किंमतही वाढली. या कारसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जाते.


  जगातील सुरक्षित कार
  - बीएमडब्ल्यू 760 एलआयमध्ये करण्यात आलेल्या मॉडिफिकेशन्समुळे ही जगातील सुरक्षित कार ठरली आहे.
  - मुंबईच्या मोटार व्हेईकल डिपार्टमेंटला 1.6 कोटी रुपये देऊन रेकॉर्ड रजिस्टर कॉस्ट दिली होती.
  - भारतात यापूर्वी कोणीही एवढी मोठी रजिस्ट्रेशन फी दिली नव्हती.

  पुढील स्लाईडवर वाचा, या कारचे आणखी काही फिचर्स....

 • reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank

  झेड सुरक्षेनुसार मॉडिफिकेशन
  बीएसडब्ल्यू 760 एलआयची ऑन रोड कॉस्ट 1.9 कोटी रुपये आहे. पण अंबानी यांच्या झेड कॅटेगरी सुरक्षेनुसार यात मॉडिफिकेशन करण्यात आल्या आहेत. तसेच आर्म्ड कारवर तब्बल 300 टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली जाते. त्यामुळे या कारची किंमत 8.5 कोटी रुपये झाली आहे.

   

 • reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank

  बुलेट फ्रुप विंडो
  अंबानी यांची आर्म्ड बीएमडब्ल्यू 760 एलआय ही कार व्हीआर 7 ब्लास्टिक प्रोटेक्शनला अनुकूल अशी मॉडिफाय करण्यात आली आहे. हिच्या डोअर पॅनलच्या आत केवलर प्लेट्स आहेत. प्रत्येक विंडो 65 एमएम जाडीची आणि 150 किलोग्रॅम वजनाची असून बुलेट फ्रुप आहे.

   

 • reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank

  आर्मी ग्रेड शस्त्रांचाही मुकाबला करते
  हॅंड ग्रेनेड, 17 किलोग्रॅमपर्यंत हाय इंटेनसिटी टीएनटी ब्लास्ट आदी आर्मी दर्जाच्या स्फोटकांचाही कारवर परिणाम होत नाही. लॅंड माईनसाठीही या कारची चाचणी घेण्यात आली आहे.

   

 • reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank

  ड्युअल लेअर टायर
  या कारला डुबल लेअर टायर बसविण्यात आले आहेत. टायरवर गोळीबार केला तरी त्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे ही कार अधिक सुरक्षित होते.

   

 • reliance owner Mukesh Ambani car features, it is like war tank

  इंजिनही पॉवरफुल
  इंजन : वी12 6.0 लीटर पेट्रोल
  पॉवर : 544 बीएचपी

  टॉर्क : 750 एनएम...

Trending