Home | Business | Auto | 100cc royal Indian bullet looks similar to royal enfield

Royal Indian Bullet: 60 ते 70 हजार रुपये किंमत, देते 90 Kmpl चे मायलेज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 23, 2018, 07:43 PM IST

Royal Enfield ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तुम्ही मोटरसायकल चालवत असाल किंवा नसाल पण तुम्हाला ही दुचाकी न

 • 100cc royal Indian bullet looks similar to royal enfield

  नवी दिल्ली- Royal Enfield ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तुम्ही मोटरसायकल चालवत असाल किंवा नसाल पण तुम्हाला ही दुचाकी नक्कीच माहिती असते. असे अनेक लोक आहेत जे कमी बजेट असल्याने रॉयल एनफील्ड खरेदी करु शकत नाहीत. लोकांची हीच पॅशन पाहून एका कंपनीने रॉयल इंडियनच्या नावाने Royal Enfield सारखी दिसणारी बाईक बाजारात आणली आहे. ही बाईक भुवनेश्वर येथील रॉयल उडो कंपनीने बनवली आहे. ही दिसायला बुलेटसारखी आहे. या बाईकमध्ये 100 सीसीचे इंजिन आहे.

  किती मिळते-जुळते आहे डिझाईन
  रॉयल इंडियन बुलेटचे फ्यूल टॅंक, सीट, स्पोक व्हील्स आणि राउंड हेडलॅम्प हे दिसायला रॉयल एनफिल्ड बुलेटसारखेच आहे. इतकेच नाही सीटच्या मागे 'Bullet' असा शब्दही वापरण्यात आला आहे. याशिवाय फ्यूल टॅंकवर असलेले रबर प्रोटेक्शन, बॅटरी कव्हर आणि टूल बॉक्सचे इिझाईनही दिसायला सारखेच आहे. 100 सीसी रॉयल इंडि‍यन बुलेटचे एग्जॉस्टही तसेच आहे जसे रॉयल एनफील्ड बाईकचे आहे. सगळ्यात मोठा फरक हा इंजिनात आहे. पण रॉयल इंडियन बुलेट तुम्हाला बऱ्याच प्रमाणात बुलेटसारखीच दिसते.

  धक-धक सारखा आवाजही
  100 सीसी रॉयल इंडि‍यन बुलेटचा आवाज हा तुम्हाला रॉयल एनफील्ड बाईकसारखाच जाणवेल. खरे तर 100 सीसी इंजिन बाइककडून अशा आवाजाची अपेक्षा करता येत नाही.

  किंमत आणि मायलेज
  100 सीसी रॉयल इंडि‍यन बुलेट अशा लोकांसाठी बनविण्यात आली आहे ज्यांना रॉयल एनफील्‍ड आवडते. कमी बजेट असल्याने ज्यांना ती खरेदी करता येत नाही. ही 100 सीसी रॉयल इंडि‍यन बुलेट तुम्ही 60 ते 70 हजार रुपयात तुम्ही खरेदी करु शकता. ही बाईक 90 कि‍मी प्रती‍ लीटरचे मायलेज देते.

Trending