आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे विना क्लच वायर Bike चालविण्याची पध्दत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अनेकदा बाईकचा क्लच तुटल्यावर दुचाकीस्वार मॅकेनिकच्या शोधात आपली बाईक पायी ओढून नेत असतात. अशावेळी दुचाकीस्वाराला बराच त्रास सहन करावा लागतो. या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्हाला दुचाकीची तांत्रिक माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही क्लचविनाही बाईक चालवू शकता. आम्ही याविषयीच्या काही ट्रिक्स तुम्हाला सांगत आहोत.

 

 

बाईक कशी कराल न्युट्रल
सगळ्यात पहिल्यादा बाईक एका ठिकाणी उभी करुन न्युट्रल करा आणि स्टार्ट करा. चांगल्या रितीने तुम्ही दुचाकीवर बसा आणि दोन्ही हॅडलवर आपले शरीर बॅलेन्स करा. त्यानंतर बाईकला पहिल्या गिअरमध्ये टाका. लक्षात ठेवा तुम्ही विना क्लच बाईक ऑपरेट करत आहात. त्यामुळे पहिल्या गिअरमध्ये बाईक टाकल्यावर ती मूव्ह होऊ लागेल.

 

 

एक्सिलेटरने योग्य वेग द्या
तुम्ही शिफ्टिंग सोबत एक्सिलेटरला योग्य वेग न दिल्यास बाईक बंद होईल. त्यामुळे बाईकला शिफ्ट करताना तिला हळूच वेग द्या. बाईकला मुव्हमेंट मिळाल्यावर तुम्ही पुढे जाण्यास सुरुवात करा. तुम्ही जेव्हा बाईक दुसऱ्या गिअरमध्ये टाकाल तेव्हा झटका बसेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या बाईकला क्लच नाही. तुम्ही तिला डायरेक्ट चालवत आहात. 

 

 

ट्रॅफिकमध्ये चालवू नका बाईक
बाईकचा वेग हा ताशी ते 30 ते 35 किलोमीटरपेक्षा अधिक ठेवू नका. कारण तुम्हाला गिअर बदलता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्या गिअरवरच वाहन चालवावे लागणार आहे. अशा रस्त्यावर वाहन चालवा जेथे वाहतूक नाही. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा VIDEO

 

बातम्या आणखी आहेत...