आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bikes: काचेची टाकी असलेली रॉयल इनफील्ड, बाहेरुन दिसू शकते पेट्रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क- मुंबईची कंपनी R&G (राजू अॅण्ड गणेश) ने रॉयल इनफील्ड Thunderbird 350 मॉडीफाय करुन त्याला पेट्रोल टॅंक लावले. असे पहिल्यांदाच घडले होते की देशातील कोणत्या गाडीचे पेट्रोल टॅंक काचेचे बनविण्यात आले आहे. टॅंक सोबतच बुलेटच्या दुसऱ्या भागांनाही रिडिझाईन करण्यात आले होते. याला विंटेज लुक देण्यात आला आहे. त्यामुळे ती अधिकच आकर्षक वाटत आहे.

 

 

# 13 लीटरचे टॅंक
- काचेचे फ्यूल टँक ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो की काच फुटल्यास काय होणार
- याबाबत R&G ने सांगितले की ही काचेची टाकी 13 लीटरची आहे. टॅंकच्या चारही बाजूने मेटलचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे ते मजबूत झाले आहे.
- हे टॅंक हार्ड, हायली टेम्पर्ड, शॉकप्रूफ आणि शटरप्रूफ आहे. म्हणजेच ते पुर्णपणे सेफ आहे. 
- हे वापरताना वाहनचालकास कोणताही त्रास होणार नाही. या टॅंकमध्ये असलेले पेट्रोल तुम्हाला दिसते.  

 

 

# तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यश
- बुलेटचे काचेचे फ्यूल टॅंक बनविण्यासाठी R&G ला बरीच मेहनत करावी लागली.
- सुरुवातीला दोन वेळा असे फ्यूल टॅंक बनविण्यात अपयश आले होते. तिसऱ्या वेळेस मात्र ते सफल ठरले.  

 

 

पुढील स्लाईडवर पाहा VIDEO

बातम्या आणखी आहेत...