Home | Business | Auto | ather 340 electric scooter launched

देशातील पहिली स्मार्ट ई-स्कूटर Ather S340 लॉन्‍च, किंमत 1.09 लाखापासून सुरू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 06, 2018, 12:01 AM IST

दीर्घ प्रतिक्षेनंतर Ather S340 भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. ही देशातील पहिली स्मार्ट स्कूटर आहे. बं

 • ather 340 electric scooter launched
  Ather Energy सुरू करणारे तरूण मेहता आणि स्‍वप्‍निल जैन.

  नवी दिल्ली- दीर्घ प्रतिक्षेनंतर Ather S340 भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. ही देशातील पहिली स्मार्ट स्कूटर आहे. बंगळुरू येथील स्टार्टअप Ather Energy ने अनेक फीचर्ससह ही ई-स्कूटर आणली आहे. Ather S340 ची किंमत 1,09,750 रुपये (बंगळुरू येथील ऑन रोड किंमत) आहे. यात नोंदणी, विमा आणि स्मार्ट कार्डचा समावेश आहे. प्रायझिंग प्लॅनमध्ये 700 रुपयांचे अतिरिक्त मासिक सबस्क्रिबशन आहे. या अंतर्गत तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी आणि घरात मोफत चार्जिग, नियमित देखभाल, बिघडल्यास मदत आणि अनलिमिटेड डाटा अशा सेवा पुरविण्यात येतात.

  Ather S340 ची टॉप स्‍पीड
  Ather S340 मध्ये IP67 वॉटरप्रूफिंग रेटेड लि‍थि‍यम आयन बॅटरी पॅक आहे. ती चार्ज झाल्यावर स्कूटर 60 कि‍मी ताशी वेगाने चालू शकते. ताशी 72 कि‍मी हा तिचा कमाल वेग आहे. कंपनीने दावा केला आहे की 7.3 सेकंदात ही कंपनी 0 ते 40 Kmph चा स्पीड पकडेल. Ather 340 एक स्‍मार्ट कनेक्‍टेड इलेक्‍ट्रि‍क स्‍कूटर आहे. ज्यात रि‍मोट डायग्‍नोस्‍टि‍क्‍स, सॅटेलाईट नॅवि‍गेशनसोबत फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक आणि टेलस्कॉपिक फ्रंट सस्पेंशन आहे.

  Ather 450 लॉन्च
  कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 ही लॉन्च करण्यात आली आहे. तिची किंमत 1,24,750 रुपये आहे. Ather 450 केवळ 3.9 सेकंदात 0 ते 40 Kmph ची स्‍पीड पकडते. कंपनीचा दावा आहे की टॉप स्पीड 80 Kmph आहे. इकोनॉमिक मोडवर ती 75 Km धावू शकते.

Trending