Ferrari 250 GTO जगातील सगळ्यात महागडी कार, किंमत एकुण तुम्हीही व्हाल थक्क
एकेकाळी जगातील सगळ्यात लोकप्रिय कार असलेली 1963 मधील फेरारी 250 GTO ही आता जगातील सगळ्यात महागडी कार ठरली आह
-
नवी दिल्ली- एकेकाळी जगातील सगळ्यात लोकप्रिय कार असलेली 1963 मधील फेरारी 250 GTO ही आता जगातील सगळ्यात महागडी कार ठरली आहे. चेसिस नंबर 4153 GT ला रिकॉर्ड 7 कोटी डॉलरला म्हणजेच 469 कोटी रुपयांना विकण्यात आले आहे. या कारला अमेरिकेतील फेराली कलेक्टर डेव्हिड मॅकनिलला विकण्यात आले आहे. ते वेदर टेक कंपनीचे सीईओ आहेत. त्यांची कंपनी कारसाठी फ्लोर मॅट्स आणि अॅक्सेसरीज बनविण्याचे काम करते.
पहिलीत कितीत विकली गेली होती ही कार
फेरारी 250 GTO ही नेहमी महागड्या कारच्या यादीत टॉपवर होती. काही वर्षापुर्वी लिलावात ही कार 3.5 कोटी डॉलरला विकण्यात आली होती. असे सांगण्यात येते की ती एका खासगी सेलरने 5 कोटी डॉलरला खरेदी केले होते. आता तिने सगळे जुने रेकॉर्ड तोडले आहेत. हे खूपच स्वाभाविक आहे. कारण क्लासिक कारमध्ये गुंतवणूक सगळ्यात सुरक्षित मानण्यात येते.खास नंबर
फेरारी 250 GTO ला अनेक लोक आयकॉनिक रेड #22 किंवा #46 म्हणून ओळखतात. याहूनही जास्त आयकॉनिक चेसिस नंबर 4153 GT आहे. हिला फेरारी 250 GTO Tour De France म्हणूनही ओळखले जाते.पुढे वाचा: अनेक स्पर्धेत दिसली होती ही कार
-
अनेक स्पर्धेत दिसली होती ही कार
फॅक्टरी सिल्वर पेटेंड फरारी 250 GTO अनेक ऐतिहासिक रेसिंगचा हिस्सा राहिली आहे. 1964 Tour De France जिंकल्यानंतर फेरारी रेस टीम Ecurie Francochamps मध्ये होती. ही कार 1963 Le Mans मध्ये चौथी आली होती आणि तिने 1965 Angloan Grand Prix मध्ये भाग घेतला होता.
पुढे वाचा...
-
इंजिन
फरारी 250 GTO सगळ्या फेरारी कारमध्ये सगळ्यात चांगली मानली जाते. या कारमध्ये 3 लीटर व्ही 12 इंजिन आहे. ते 300 बीएचपी पॉवर जेनरेट करते. ही कार 1963 मध्ये 18 हजार डॉलरमध्ये लॉन्च करण्यात आले होते.