Home | Business | Auto | ATO UTLT car owners make their car as garbage collector vehicle

पुणेकराने Luxury Car ची केली कचरागाडी, डीलरचा राग आल्यावर केले असे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 09, 2018, 08:21 PM IST

चांगली सर्व्हिस न मिळाल्यास कोण काय करेल हे सांगता येत नाही. त्यात ती व्यक्ती जर पुणेकर असेल तर कल्पनाच केले

 • ATO UTLT car owners make their car as garbage collector vehicle

  नवी दिल्ली- चांगली सर्व्हिस न मिळाल्यास कोण काय करेल हे सांगता येत नाही. त्यात ती व्यक्ती जर पुणेकर असेल तर कल्पनाच केलेली बरी अशीच एक घटना घडली आहे. पुण्यातील हेमराज चौधरी यांनी एका कार कंपनीच्या डीलरशीपकडून वाईट अनुभव आल्यावर आपली टोयोटा फॉर्च्‍यूनर कार कचरा वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे.

  पुढे वाचा: अल्वरच्या राजानेही केले होते असे काही...

 • ATO UTLT car owners make their car as garbage collector vehicle

  अल्‍वरच्या राजाने केले होते असे काही


  - अल्वरचे राजे जय सिंह 1920 मध्ये रॉल्स रॉयस खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांचे राहणीमान सामान्य व्यक्तीप्रमाणे असल्याने सेल्समनला ते रॉल्य रॉयसचे ग्राहक वाटले नाहीत. त्याने त्यांना बाहेर काढले. यामुळे जय सिंह यांनी आपल्या मॅनेजरला या त्या शोरुममधील सगळ्या सात कार खरेदी करण्यास सांगितले आणि या कारची डिलिव्हरी भारतात करण्यास सांगितले. 

  डिलिव्हरीसाठी हा सेल्समन महाराजांच्यासमोर गेल्यावर त्यांनी या कार नगरपालिकेकडे कचरा वाहण्यासाठी पाठवून दिल्या. 
   

 • ATO UTLT car owners make their car as garbage collector vehicle

  रेनो डस्टरचा कचरा वाहण्यासाठी उपयोग


  कोटा येथील एक व्यापारी राजेश परेता यांनी आपली रेनो डस्टर कचरा उचलण्यासाठी मोदक ग्रामपंचायतीला दिली आहे. रेनोची ही कार त्यांनी 2012 मध्ये खरेदी केली होती. इलेक्‍ट्रि‍कल आणि एअर कंडीशन प्रॉब्‍लम्‍समुळे त्यांची ही कार 200 दिवस तशीच उभी होती. याचा निषेध म्हणून त्यांनी असे केले.
   

 • ATO UTLT car owners make their car as garbage collector vehicle

  गाढवाने ओढली जॅग्वार


  अहमदाबाद येथील एका उद्योजकाना आपल्या जॅग्वारला चक्क गाढवांमार्फत धक्का मारला. ते आपली जॅग्वार XF अनेकदा डीलरकडे घेऊन गेले पण त्यांनी ती नीट दुरुस्त केली नाही. यामुळे त्रस्त झाल्याने त्यांनी ती गाढवामार्फत शहरभर फिरवली.

   

Trending