Home | Business | Auto | ATO UTLT tata motors nevers these showcased cars

Tata च्या या कार कधीच झाल्या नाहीत लॉन्च, जगासमोर केल्या होत्या सादर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 02, 2018, 12:04 PM IST

देशातील सगळ्यात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटरने आपला महत्वाकांक्षी स्पोटर्स कार प्रोजेक्ट RaceMo बंद केला आ

 • ATO UTLT tata motors nevers these showcased cars

  नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटरने आपला महत्वाकांक्षी स्पोटर्स कार प्रोजेक्ट RaceMo बंद केला आहे. हा प्रोजेक्ट गतवर्षी जिनेव्हा आंतरराष्ट्रीय मोटार शोमध्ये सादर करण्यात आला होता. RaceMo हा असा पहिला कार प्रोजेक्ट नाही जो टाटा मोटर्सने सुरु केल्यानंतर बंद केला आहे. कंपनीने यापूर्वीही अनेक आकर्षक कन्सेप्ट कार सादर केल्या पण त्या बाजारात दाखल झाल्याच नाहीत.

  Aria Coupe
  आरिया कुपेचा आरिया एमपीवीशी काहीही संबंध नाही. आरिया कूपेची कन्सेप्ट आरिया एमपीवी मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या खूप आधी सादर करण्यात आली होती. ही कार 2001 मध्ये पहिल्यांदा जिनेव्हा मोटारमध्ये सादर करण्यात आली होती. टाटा मोटर्स या कारबाबत बरीच गंभीर होती. रतन टाटा म्हणाले होते की, कंपनी ही कार बनविण्यासाठी लोकेशन शोधत आहे. आरिया कूपेचे प्रोडेक्शन सुरुच होऊ शकले नाही.

  पुढे वाचा...

 • ATO UTLT tata motors nevers these showcased cars

  Tata Pr1ma


  टाटा Pr1ma एक सेडान कॉन्सेप्‍ट होती. जी प्रति‍ष्‍ठि‍त कार डि‍झायनर Pininfarina ने डिझाईन केली होती. Pr1ma ला इंडिगो प्लेटफॉर्मवर बनविण्यात आले होते. ही कार 2009 जिनेव्हा मोटार शोमध्ये सादर करण्यात आली. कार प्रॉडक्शन रेडी होती पण ती बाजारात आणण्यात आली नाही. Pr1ma डी-सेगमेंटमध्ये बाजारात आणण्यात येईल असे सांगण्यात येत होते पण टाटा मोटर्सने हा प्रोजेक्ट बंद केला.
   

  पुढे वाचा आणखी काही कारची माहिती

 • ATO UTLT tata motors nevers these showcased cars

  Magna 


  टाटा Magna हा टाटा मोटर्सच्या सगळ्यात मोठा प्रकल्पांपैकी एक होता. कंपनीने या कारचे काही प्रोटोटाईपही बनवले होते. Magna मध्ये 2.0 लीटर पेट्रोल इंजिन होते. ते 120 बीएचपी पॉवर जेनरेट करत होते. हेच इंजिन सफारीतही लावण्यात आले होते. ही कार होंडा अकॉर्ड आणि ह्युंडई सोनाटाला टक्कर देईल, असे सांगण्यात येत होते.
   

  पुढे वाचा आणखी काही कारची माहिती

 • ATO UTLT tata motors nevers these showcased cars

  Megapixel


  टाटा मेगापिक्सल कॉन्सेप्ट एक रेंज एक्सटेंडेड इलेक्ट्रिक व्हीकल (REEV) होती जी 2012 मध्ये जिनेव्हा ऑटो शोमध्ये सादर करण्यात आली होती. मेगापिक्सल ही टाटा पिक्सलची सुधारित आवृत्ती होती. ती 2012 दि‍ल्‍ली ऑटो एक्‍सपोत सादर करण्यात आली होती. कंपनीचा दावा होती की ती एकदा चार्ज केल्यावर 900 कि‍मी चालू शकते.

   

  पुढे वाचा आणखी एका कारविषयी माहिती

 • ATO UTLT tata motors nevers these showcased cars

  Indiva MPV

   

  टाटा इंडि‍वा एमपीवी कॉन्‍सेप्‍टला इटालि‍यन डि‍झाईन आणि प्रोटोटाइप हाउस I.D.E.A. ने डि‍झाईन केले होते. इंडि‍वाला इंडि‍का प्‍लेटफॉर्मवर बनविण्यात आले होते.

Trending