Home | Business | Auto | Auto Trick How To Start Bike If Your Kick And Battery Not Working

Self, किक खराब झाल्यावर धक्का न देता अशी स्टार्ट करा Bike

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 17, 2018, 11:01 AM IST

बाईक चालविताना कधी-कधी अशी स्थिती येते की बाईक स्टार्ट होत नाही. याचे कारण किक खराब होणे किंवा बॅटरी डिस्चार

 • Auto Trick How To Start Bike If Your Kick And Battery Not Working

  ऑटो डेस्क- बाईक चालविताना कधी-कधी अशी स्थिती येते की बाईक स्टार्ट होत नाही. याचे कारण किक खराब होणे किंवा बॅटरी डिस्चार्ज हे असते. अशा वेळी बाईक स्टार्ट करणे हे अवघड काम असते. तुम्ही एकटे असाल तर हे काम अधिकच अवघड होते.


  # किक नसलेली बाईक
  - बजाजने एव्हेंजर 150 मध्ये किक दिली आहे. ही देशातील पहिली अशी बाईक आहे जी किक शिवाय लॉन्च झाली आहे.
  - यात पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण काही काळानंतर ही बॅटरी कुमकुवत होते. त्यामुळे सेल्फ स्टार्टला प्रॉब्लेम येतो.
  - त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे ज्यामुळे बाईक स्टार्ट होण्यास मदत होईल.

  # धक्का न मारण्याची ट्रिक
  - तुम्ही बाईक धक्का मारुनही स्टार्ट करु शकता. पण त्यासाठी दोन जणांची गरज असते.
  - एक जण बाईकला नियंत्रित करत असतो तर दुसरा तिला धक्का मारत असतो.
  - हे काम तुम्ही बाईकचे क्लच दाबूनही करु शकता पण ते थोडे रिस्की असते.
  - तुम्ही धक्का न मारताही ही बाईक स्टार्ट करु शकता.

  पुढे वाचा: बाईकला विना किक, सेल्फ आणि धक्का न मारता काही सेकंदात कसे स्टार्ट कराल

 • Auto Trick How To Start Bike If Your Kick And Battery Not Working

  - सगळ्यात प्रथम बाईकला चावी लावून इंजिन ऑन करा. बाईकला टॉप गिअरमध्ये टाका.
  - तुमच्या बाईकला चार गिअर असतील तर तिला चौथ्या गिअरमध्ये आणा, असेच पाच गिअर असल्यास त्याबाबतही करु शकता.
  - टॉप गिअरमध्ये टाकल्यानंतर बाईकच्या मागच्या चाकाला वरच्या दिशेने फिरवा.

   

   

  पुढील स्लाईडवर वाचा आणखी माहिती

 • Auto Trick How To Start Bike If Your Kick And Battery Not Working

  - जर चाक वरच्या दिशेने फिरत नसेल तर ते थोडे मागे-पुढे करुन फ्री करा. हे काम तुम्ही सहज करु शकता.
  - व्हील फ्री झाल्यावर त्याला वरच्या दिशेने फिरवा. एका किंवा दोन प्रयत्नात बाईक स्टार्ट होणार नाही पण इंजिन स्ट्रार्ट होते.
  - बाईकचे इंजिन स्टार्ट झाल्यवर एक्सिलेटरच्या मदतीने तिला नियंत्रित करा.

   

Trending