Home | Business | Auto | best cars to buy under rs 3 lakh

तुमचे बजेट 3 लाखाहून कमी असल्यास खरेदी करा या 5 कार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 20, 2018, 12:06 AM IST

कार खरेदी करण्याची इच्छा असली तरी बजेटमुळे अनेक जण हा प्लॅन पुढे ढकलतात किंवा टाळतात. मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत ज

 • best cars to buy under rs 3 lakh

  नवी दिल्ली- कार खरेदी करण्याची इच्छा असली तरी बजेटमुळे अनेक जण हा प्लॅन पुढे ढकलतात किंवा टाळतात. मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत ज्या लहान फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकप्रिय आहेत. या कारची किंमतही अतिशय कमी आहे. या कारची किंमत 3 लाखापेक्षा कमी आहे. आणखी एक खास बाब म्हणजे या कारचा मेन्टेनेंस खर्चही अतिशय कमी आहे. एकुणच या कार तुमच्यासाठी फायद्याचा सौदा ठरतील. येथे आम्ही तुम्हाला असेच काही ऑप्शन्स सांगत आहोत.

  रेनो क्‍वि‍ड
  रेनोची सगळ्यात स्वस्त कार क्विडची डिमांडही वेगाने वाढत आहे. लहान कारच्या बाजारात ऑल्टोनंतर क्विडचा नंबर येतो. क्विड सध्या चार वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

  क्‍वि‍डची स्‍पेसि‍फि‍केशन
  किंमत: 2.66 लाखापासून सुरुवात (एक्स शोरुम दिल्ली)
  इंजिन: 799 सीसी
  पॉवर: 54 पीएस
  मायलेज: 25.17 किमी प्रती लीटर

  फीचर्स
  मोनो टोन डॅशबोर्ड
  प्लेन डिजिटल इंस्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर
  प्‍लेन साइड एअर वेंट
  फ्लोअर कनसोलसोबत दोन कॅन होल्‍डर्स
  पार्किंग ब्रेक कनसोल

  पुढे वाचा...

 • best cars to buy under rs 3 lakh

  ऑल्‍टो 800
   
  मारुती सुझुकीची ऑल्‍टो 800 ही  भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. 2017-18 मधील ती बेस्‍ट सेलिंग कार आहे. 
    
  ऑल्‍टो 800 चे स्‍पेसि‍फि‍केशन 
   
  किंमत : 2.54 लाखापासून सुरु (एक्‍स शोरूम दि‍ल्ली)
  इंजिन : 796 सीसी   
  पॉवर : 48 पीएस    
  मायलेज : 24.7 कि‍मी प्रती लीटर (पेट्रोल), 33.44 कि‍मी प्रती कि‍लोग्रॅम (सीएनजी)  
   
  फीचर्स
    
  फॉग लॅम्‍प 
  सीएनजी ऑप्‍शन 
  फॅब्रि‍क आपहोलस्‍ट्री ऑन डोर पॅनल
  रियर डोर चाइल्‍ड लॉक 

   

  पुढे वाचा...

 • best cars to buy under rs 3 lakh
 • best cars to buy under rs 3 lakh
 • best cars to buy under rs 3 lakh

  टाटा जेन नेक्‍स्‍ट नॅनो   
   
  टाटाने देशातील पहिली आणि सगळ्यात स्वस्त कार नॅनो लॉन्‍च केली होती. परंतु नॅनोला अपेक्षित यश मिळाले नाही.
   
  टाटा नॅनोचे फीचर्स  
   
  किंमत : 2.36 लाख रुपयांपासून सुरू (एक्‍स शोरूम दि‍ल्ली)
  इंजिन : 624 सीसी 
  पॉवर : 38 पीएस 
  मायलेज : 21.9 कि‍मी प्रती लीटर

Trending