आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील Best Selling इलेक्‍ट्रि‍क कार, चार्ज झाल्यावर चालते 234 Km

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगात सगळ्यात जास्त विक्री होणारी इलेक्‍ट्रि‍क कार लवकरच भारतात येणार आहे. निसान इंडियाचे अध्यक्षांनी सांगितले की, Nissan leaf चे दूसरे जनरेशन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. जपानची कार कंपनी निसान भारतात आपला मार्केट शेअर 2020 पर्यंत 5 टक्क्यावर नेऊ इच्छित आहे. यासाठी कंपनी आपल्या पोर्टफोलिओत नव्या कार सामिल करण्याचे नियोजन करत आहे.

 

 

या प्रकारचे मॉडेल्स कंपनी करणार लॉन्च
कंपनी 10 लाख रुपयांचे कार सेगमेंट आणि रुरल मार्केट टार्गेट करत आहे. स्पोटर्स यूटिलिटी व्हिकल लॉन्च करण्याशिवाय निसान इंडिया भारतात  इलेक्‍ट्रि‍क व्‍हीकल लीफ-2 आणत आहे. 

निसान इंडियाचे (ऑपरेशन्स) अध्यक्ष थॉमस कूहल म्हणाले की, कंपनीचा सध्याचा मार्केट हिस्सा हा 1.6 टक्के आहे. तो 2022 पर्यंत 5 टक्के होऊ शकतो. ते म्हणाले की, 12 ते 18 महिन्यात ते त्या सेगमेंट उतरणार आहेत ज्या सेगमेंटमध्ये ते सध्या नाहीत. याद्वारे ते आणखी एक टक्का बाजारपेठ काबीज करतील.

 

 

भारतात किती असू शकते निसान लीफची किंमत
लीफ-2 ला CBU च्या माध्यमातून इंपोर्ट करण्यात येईल. त्यामुळे त्यावर करआकारणी अधिक असेल. भारतात त्याची एक्‍स शोरूम किंमत जवळपास 30 लाख ते 40 लाख रुपये असेल.

 

 

निसान लीफ-2 मध्ये पॉवर फुल बॅटरी
निसानच्या ऑल न्यू लीफमध्ये 40-kilowatt-hour lithium-ion बॅटरी पॅक आहे. ती केबिन फ्लोअरच्या खाली लावण्यात आली आहे. ती तेवढीच जागा घेते जेवढी जुन्या 2011 ची लीफ 24 kwh पॅक घेत होती. यावरुन लक्षात येते की मागील सात वर्षात इलेक्ट्रिक कार बॅटरीमध्ये किती सुधार झाला आहे. 
 

 

पुढे वाचा...

 

 

बातम्या आणखी आहेत...