आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW इंडि‍याने लॉन्‍च केली X3 पेट्रोल, किंमत 56.9 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर्मनीची लक्झरी कार कंपनी BMW ने आपल्या नव्या X3 स्‍पोर्ट्स यूटिलि‍टी व्‍हीकलचे पेट्रोल वेरिएंट लॉन्च केले आहे. त्याची किंमत भारतात 56.9 लाख रुपये (एक्‍स शोरूम) आहे.  BMW इंडि‍याच्या चेन्नई येथील प्लॅन्टमध्ये ही कार बनविण्यात येत आहे.

 

 

कंपनीने काय म्हटलंय
BMW इंडि‍याचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी म्हटले आहे की, ऑल न्‍यू BMW X3 xDrive30i च्या लॉन्‍चनंतर आता आमचे ग्राहक पेट्रोल इंजिन ऑप्शनचा अनुभवही घेऊ शकतात. ते म्हणाले नव्या BMW X3 मध्ये दोन लीटरचे चार सि‍लेंडर पेट्रोल इंजिन आहे. ते 252 एचपी पॉवर जेनरेट करते. ही कार केवळ 6.3 सेकंदात 0 से 100 कि‍मी प्रती तासाचा वेग पकडते. या इंजिनसोबत 8 स्‍पीड ऑटोमॅटि‍क ट्रान्समि‍शन आहे.

 

 

दूसरे फीचर्स
नव्या BMW X3 मध्ये अॅडव्हास सेफ्टी टेक्नोलॉजीचा म्हणजेच एटेंटि‍व्‍नेस असि‍स्‍टेंस, डायनॅमि‍क स्‍टेबि‍लि‍टी कंट्रोल (DSC) याचा समावेश आहे. याशिवाय कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल (CBC), इलेक्‍ट्रि‍क पार्किंग ब्रेकसोबत ऑटो होल्ड आणि साईड इम्पॅक्ट प्रोटेक्शनशिवाय सहा एअरबॅग मिळतात.

बातम्या आणखी आहेत...