Home | Business | Auto | buy cars from maruti to hyundai with under rs 5000 emi

5000 पेक्षा कमीच्या EMI वर खरेदी करा कार, मारुती ते ह्युंडई ऑप्‍शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2018, 05:25 PM IST

मध्यमवर्गाची काही स्वप्ने असतात. यापैकीच एक स्वप्न असते स्वत:च्या कारचे. पण जेव्हा तो हे स्वप्न साकार करण्या

 • buy cars from maruti to hyundai with under rs 5000 emi

  नवी दिल्ली- मध्यमवर्गाची काही स्वप्ने असतात. यापैकीच एक स्वप्न असते स्वत:च्या कारचे. पण जेव्हा तो हे स्वप्न साकार करण्याचा विचार करतो तेव्हा त्याला आपला दर महिन्याचा खर्च आणि मासिक हप्त्याचा ताळमेळ बसेल का याचा विचार सतावतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही कारविषयी माहिती देत आहोत ज्यांचा मासिक हप्ता 5,000 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुमचे बजेटही कोलमडणार नाही आणि तुमचे कारचे स्वप्नही साकार होईल. यासाठी तुम्हाला एक लाखाचे डाऊनपेमेंट मात्र करावे लागेल.

  चला पाहू या असे काही ऑप्शन्स

  टाटा टिआगो
  टाटा मोटर्सची टिआगो ही लोकप्रिय स्मॉल कार आहे. ती तुम्ही अतिशय कमी ईएमआयवर खरेदी करु शकता. एसबीआयकडून सध्या स्वस्त कार लोनची एक योजना चालू आहे. या योजनेचा लाभ तुम्ही तुमचे हे स्वप्न साकारण्यासाठी घेऊ शकता. या अंतर्गत तुम्ही 9.25 टक्के व्याजदराने कार घेऊ शकता.

  किंमत : 3.35 लाख रुपयांपासून सुरु
  मासिक हप्ता : 4,907 रुपये
  डाउन पेमेंट : 1 लाख रुपये
  महिने : 60

  पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन्स

 • buy cars from maruti to hyundai with under rs 5000 emi

  डॅटसन गो
  डॅटसन गो आपल्या कारवर फायनान्सचा ऑप्शन देत आहे. अशात जर तुम्ही मासिक 5 हजार रुपये खर्च करुन कार घेण्यास इच्छूक असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

   

  किंमत: 3.35 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली)
  मासिक हप्ता: 4,907 रुपये
  डाउन पेमेंट : 1 लाख रुपये 
  महिने : 60

   

   

  पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन

 • buy cars from maruti to hyundai with under rs 5000 emi

  डॅटसन रेडी गो
  डॅटसनचे दुसरे मॉडेल रेडी आहे. क्रॉसओव्हर व हॅचबॅकचा संगम असलेली ही कार तुम्ही कमी मासिक हप्त्यावर खरेदी करु शकता. 

   

  किंमत: 2.50 लाख रुपये
  मासिक हप्ता: 3,132 रुपये
  डाउन पेमेंट : 1 लाख रुपये
  महिने: 60 

   

   

  पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन

 • buy cars from maruti to hyundai with under rs 5000 emi

  ह्युंदाई ‘इऑन’
  ह्युंदाईची ‘इऑन’ ही कार तुम्ही 5 हजार रुपयांपेक्षा कमी ईएमआयवर खरेदी करु शकता. हा ईएमआयही एसबीआयच्या लोन स्कीमनुसार आहे.

   

  किंमत: 3.29 लाख रुपये
  ईएमआई: 4,781 रुपये
  डाउन पेमेंट: 1 लाख रुपये
  महिने: 60

   

  पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन

 • buy cars from maruti to hyundai with under rs 5000 emi

  मारुती अल्टो 800 

  मारुती अल्टोने सलग 13 वर्षे सर्वाधिक विक्री झालेली कार म्हणून विक्रम नोंदविलेला आहे. अल्टो कार सप्टेंबर 2000 मध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली. एक दशकाहून अधिक काळ या कारचा बाजारात दबदबा राहिला आहे. त्यानंतर वेळोवेळी कारमध्ये बदल करण्यात आले. सध्याच्या मॉडेलमध्ये 800 सीसी आणि के 10 इंजिन असे दोन प्रकार उपलब्ध असून, सीएनजी व्हेरिएंटची सुविधाही देण्यात आली आहे. श्रीलंका, चिली, फिलिपाईन्स आणि उरुग्वे यांसारख्या देशांमध्येही अल्टो कारची निर्यात करण्यात येते. 

   

  किंमत: 2.51 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली)
  ईएमआय: 3,153 रुपये
  डाउन पेमेंट: 1 लाख रुपये
  महिने: 60

   

  पुढे वाचा: आणखी ऑप्शन

 • buy cars from maruti to hyundai with under rs 5000 emi

  रेनो ‘क्विड’
  रेनोची छोटी व किफायतशीर कार म्हणजे ‘क्विड’ने आपल्या सेगमेंटमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवलेली आहे. एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारमध्ये ‘क्विड’चा समावेश होतो. 

   

  किंमत : 2.66 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली)
  ईएमआय : 3,466 रुपये 
  डाउनपेमेंट : 1 लाख रुपये
  महिने : 60

Trending