Home | Business | Auto | buy premium cars like honda city to verna at cost of kwid

Kwid च्या किंमतीत खरेदी करा होंडा City-ह्युंडई Verna, या मार्केटमध्ये आहेत ऑप्शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 10, 2018, 05:29 PM IST

रेनो Kwid च्या किंमतीत तुम्ही होंडा City-ह्युंडई Verna घेऊ शकता असे तुम्हाला कुणी सांगितल्यावर तुम्ही त्यावर

 • buy premium cars like honda city to verna at cost of kwid

  नवी दिल्ली- रेनो Kwid च्या किंमतीत तुम्ही होंडा City-ह्युंडई Verna घेऊ शकता असे तुम्हाला कुणी सांगितल्यावर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण जुन्या कार बाजारात तुम्ही ही संधी मिळू शकते. नवी रेनो Kwid दिल्लीतील बाजारात 2.66 लाख ते 4.64 लाख रुपयात मिळते. आम्ही तुम्हाला या प्राईस रेंजमध्ये येणाऱ्या प्रीमियम कार ऑप्शन सांगत आहोत.

  कुठे खरेदी करु शकता सर्टि‍फाइड यूज्ड कार
  सेकंड हॅण्ड कार तुम्ही टोयोटाच्या टोयोटा ट्रस्‍ट, महिंद्राच्या फस्‍ट चॉईस आणि मारुती‍ सुझुकी इंडि‍याच्या ट्रूवॅल्‍यूमधुन घेऊ शकता. येथे कारची संपुर्ण तपासणी करण्यात आल्यानंतर त्या ग्राहकांना विकण्यात येतात. या कारसाठी अर्थपुरवठ्याची म्हणजेच फायनान्सची सुविधाही उपलब्ध आहे.

  किती आहे या कारचे मार्केट
  इंडिया ब्लू बुकच्या एका अहवालानुसार जुन्या कारचे मार्केट 2017 मध्ये जवळपास 36 लाख यूनि‍ट्स एवढे होते. हे 2016 पेक्षा 9 टक्के जास्त आहे. नोटबंदीमुळे त्यांचा विकास 6 टक्क्यांवर थांबला होता. अहवालात असेही नमूद कऱण्यात आले आहे की, भारतात जवळपास 30 हजार जुन्या कारचे डीलर आहेत.

  ह्युंडई Verna
  ह्युंडई Verna ही या कंपनीच्या बेस्ट सेलिंग कारपैकी एक आहे. कंपनीने गतवर्षी त्याचे नवे वर्जन लॉन्च केले होते. तुम्ही जुने वर्जन जुन्या कार बाजारात अतिशय कमी किंमतीत खरेदी करु शकता. सेकंड हॅण्ड कार बाजारात वेरना 2011 चे मॉडल 2.34 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये या किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. याचे जुने आणि नवे मॉडेल खूपच कम्‍फर्टेबल आहे. याचाच अर्थ रेनो क्विडच्या किंमतीत प्रीमियम कार घेऊ शकता. यासोबतच कंपनीच्या देशभरातील सर्वि‍स सेंटर्सचा फायदाही घेऊ शकता.

  पुढे वाचा...

 • buy premium cars like honda city to verna at cost of kwid

  होंडा City


  पॉप्युलर सेडान कारच्या लिस्टमध्ये होंडा नेहमीच टॉपवर होती. जुन्या कार बाजारात तुम्हाला केवळ 2.5 लाख ते 3.5 लाख रुपयात ही कार उपलब्ध होते. सिटीचे 2010 चे मॉडल तुम्ही या किंमतीवर खरेदी करु शकता. सिटीत पॉवरफुल पेट्रोल इंजिन आहे. तुम्हाला 12 ते 13 कि‍मी प्रति‍ लीटरचे मायलेजही मिळू शकते. होंडा कार इंडियाची आफ्टर सेल्स सर्व्हिसही चांगली आहे. 

   

  पुढे वाचा... 

 • buy premium cars like honda city to verna at cost of kwid

  टोयोटा ईटिओस


  तुम्हाला टोयोटा ईटिओस जुन्या कार बाजारात सहजच क्विडच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकते. तुम्ही 2011 चे टोयोटा ईटिओसचे मॉडेल 3 ते 3.5 लाख रुपयात खरेदी करु शकता. टोयोटाच्या कार भरवशाच्या मानल्या जातात. उत्तर दर्जा ही टोयोटोच्या कारची ओळख आहे.

   

  पुढे वाचा... 

 • buy premium cars like honda city to verna at cost of kwid

  होंडा अकॉर्ड


  या बाजारातुन तुम्ही होंडा अकॉर्ड खरेदी करु शकता. 2010 ची होंडा अकॉर्ड 3.5 लाख ते 4 लाख रुपयात मिळू शकते. होंडा अकॉर्डमध्ये कम्फर्ट आणि पॉवर या दोन्ही गोष्टी आहेत.

Trending