Home | Business | Auto | car launches in may 2018 in India

या महिन्यात लॉन्च होणार या 4 कार; टोयोटा, होंडा, टाटा वाढविणार स्पर्धा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 03, 2018, 10:00 AM IST

या वर्षाची सुरुवात ऑटो एक्‍स्पोने झाली होती. यात अनेक कंपन्यांनी आपल्या नव्या कार प्रदर्शित केल्या. यातील का

 • car launches in may 2018 in India

  नवी दिल्ली- या वर्षाची सुरुवात ऑटो एक्‍स्पोने झाली होती. यात अनेक कंपन्यांनी आपल्या नव्या कार प्रदर्शित केल्या. यातील काही कारची एन्ट्री या महिन्यात भारतीय बाजारात होणार आहे. मे 2018 मध्ये या कार लॉन्च करण्यात आल्यानंतर ही स्पर्धा नेक्स्ट लेव्हलवर जाईल असे मानण्यात येते. या महिन्यात लॉन्च होणाऱ्या नव्या कारमध्ये टोयोटा, होंडा, बीएमडब्‍ल्‍यू आणि टाटा मोटर्सच्या कारचा समावेश आहे.

  मिनी कंट्रीमॅन

  लॉन्‍च: 3 मे

  बीएमडब्‍ल्‍यू समूहाची कंट्रीमॅन हॅचबॅक भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. या कारला 3 मे लॉन्च करण्यात येणार आहे. कंट्रीमॅन ही मिनी 2 डोअर हॅचबॅक सेगमेंटमधील सगळ्यात व्यावहारिक कार म्हणून ओळखली जाते. 2018 मि‍नी कंट्रीमॅनमध्ये बीएमडब्ल्यू एक्स1 चा प्लॅटफॉर्म आहे. तिला चेन्नईतील प्लॅन्टमध्ये असेंबल करण्यात येणार आहे. कंट्रीमॅन पेट्रोल आणि डिझेल दोन्ही वर्जनमध्ये उपलब्ध आहे. नव्या जनरेशनची मिनी कंट्रीमॅन पुर्णपणे नव्या डिझाईनवर बनली आहे. तिला रि-इंजिनिअरर्ड करण्यात आले आहे. ़

  नवी कंट्रीमॅन दिसायला पहिल्यापेक्षा मोठी आहे. याशिवाय अंतर्गत स्पेसही वाढविण्यात आला आहे. यात अनेक फीचर्स जसे 6.5 इंच अथवा 8.8 इंच टचस्‍क्रीन इंफोटेनमेंट सि‍स्‍टम, मि‍नी ड्रायव्हिंग मोड, क्रूझ कंट्रोल, पार्क असि‍स्‍टेंट आणि हेड अप डि‍स्‍प्‍ले देण्यात आला आहे. यात अनेक सेफ्टी फीचर्सही आहेत.

  नवी होंडा अमेझ
  लॉन्‍च: 16 मे

  होंडा कार्स इंडि‍याने म्हटले आहे की,‍ त्यांनी आपल्या ऑल न्‍यू अमेझची प्री-लॉन्‍च बुकिंग सुरू केली आहे. सेकंड जनरेशन अमेझची बुकिंग कंपनीच्या सगळ्या अॅथोराईज्ड डीलरशीपवर केवळ 21,000 रुपयांवर सुरु करण्यात आली आहे. ऑल न्‍यू अमेझला पुर्णपणे नव्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. तिला पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

  टोयोटा यारि‍स

  लॉन्‍च: 18 मे

  टोयोटा कि‍र्लोस्‍कर मोटर (TKM) ने आपल्या नव्या टोयोटा यारिसच्या किमतींची घोषणा केली आहे. कंपनीने बेस वेरिएंटासाठी इंट्रोडक्टरी प्राईस 8.75 लाख रुपये एवढी ठेवली आहे. टॉप वेरि‍एंटची किंमत 14.07 लाख रुपये आहे. कंपनीने नव्या टोयोटा यारिसची बुकिंग सुरु केली आहे. तुम्ही 50 हजार रुपयात हे बुकिंग करु शकता. भारतात टोयोटा यारिसची स्पर्धा मारुती सुझुकी शिआल, होंडा सिटी आणि ह्युंडई वेरना सोबत होणार आहे.

  टाटा नेक्‍सॉन एएमटी

  लॉन्‍च: मे

  टाटा मोटर्सने आपल्या नव्या पॉप्युलर कॉम्पॅक्ट एसयूवी नेक्सॉनच्या ऑटोमॅटि‍क मॅन्युअल ट्रान्समि‍शन (एएमटी) मॉडलसाठी बुकिंग सुरु केली आहे. नेक्‍सॉन एएमटीला ऑटो एक्‍सपो 2018 मध्ये सादर करण्यात आले. टाटा मोटर्सने नेक्सॉनला गतवर्षी लॉन्च केले होते. ही कंपनीची पहिली सब कॉम्पॅक्ट एसयूवी आहे.

  टाटा नेक्सॉनच्या एएमटी वर्जनला तुम्ही 11 हजार रुपयात बुक करु शकता. नेक्सॉन एएमटीची स्पर्धा याच सेगमेंटमध्ये पहिल्यापासून असणाऱ्या फोर्ड, मारुती सुझुकी आणि महिंद्राच्या कारसोबत आहे.

  काय आहे चेंज
  नेक्‍सॉन एएमटी भारतातील पहिली कार आहे जी ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग मोडसोबत एएमटी यूनिटची ऑफर देते. याशिवाय नेक्सॉन एएमटी 'creep' फ्रंक्‍शन सुध्दा आहे. त्यामुळे हेवी ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करताना, स्टॉप अॅण्ड गो सारख्या गोष्टीमुळे मदत मिळते. टाटा नेक्सॉनमध्ये एएमटी स्मार्ट हिल असिस्टपण देण्यात आले आहे. इतकेच नाही तर यामध्ये इंटलिजन्ट ट्रान्समिशन कंट्रोलर सुध्दा आहे. अॅन्टी-स्टॉल, किक डाऊन आणि फास्ट ऑफ सारखे फीचर्सही आहेत.

  पुढे वाचा:

 • car launches in may 2018 in India
  टोयोटा कि‍र्लोस्‍कर मोटर (TKM) ने आपल्या नव्या टोयोटा यारिसच्या किमतींची घोषणा केली आहे.
 • car launches in may 2018 in India
  ही कार 3 मे रोजी लॉन्च करण्यात येणार आहे.
 • car launches in may 2018 in India
  टाटा नेक्‍सॉनच्या एएमटी वर्जनची बुकिंग सुरू झाली आहे.

Trending