आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली टेस्ला मॉडेल X SUV भारतात दाखल, वाटेल जणू कारला फुटले पंख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फोटो ओळ- मुंबई विमानतळावर आलेल्या कारचा फोटो. सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला जात आहे.)

 

मुंबई- लॉंच होण्यापूर्वीच टेस्ला मॉडेल X SUV ची पहिली कार भारतात दाखल झाली आहे. एका उद्योजकाने ही कार इम्पोर्ट केली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ती मुंबई विमानतळावर आहे. या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कारचे बेसिक मॉडेल ७३,८०० डॉलरला असून टॉप एंड मॉडेल १२८,३०० डॉलरला मिळते. भारतात ती सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला मिळण्याची शक्यता आहे.

 

फाल्कन विग्ज डोअरमुळे ही कार चर्चेत आली आहे. त्यामुळे जणू कारला पंख फुटले आहेत असा भास होतो. भारतीय रस्त्यांवर ही कार चालवायची म्हटली तर पार्किंगची समस्या उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण किमान तीन-चार कारला जेवढे जागा लागते तेवढी जागा ही एकटी कार खाईल यात काही शंका नाही.

 

सेव्हन सीटर या कारची सेकंड आणि थर्ट सीटिंग रो फोल्ड करता येते. त्यामुळे कार्गोला आणखी जागा मिळते. बॅटरी आणि ड्राईव्ह वॉरंटीसह ही कार मिळते. सुमारे ८ वर्षांसाठी ही वॉरंटी दिली जाते.

 

फोर व्हिल ड्राईव्ह, स्टॅंडर्ड सेफ्टी फिचर्स आणि सिंगल चार्जवर ४७० किलोमीटर रेन्ज या फिचर्ससह ही कार येते. विशेष म्हणजे २.९ सेकंदमध्ये ही कार ९६ किलोमीटर प्रति तासाची गती गाठू शकते. या कारला दोन इलेक्ट्रीक मोटर्स आहेत. एका मोटर पहिल्या तर दुसरी दसऱ्या एक्सेलला गती प्रदान करते.

 

या आकर्षक कारचे फोटो बघा पुढील स्लाईडवर... वाटेल की जणू कारलाच पंख फुटले आहेत....

बातम्या आणखी आहेत...