आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- फोर्ड इंडियाने नवी क्रॉस हॅचबॅक कार फ्रीस्टाइल भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने पेट्रोलवर चालणाऱ्या या कारची किंमत 5.09 लाख रुपये तर डिझेलवर चालणाऱ्या कारची किंमत 6.09 लाख रुपये ठेवली आहे. फोर्ड फ्रीस्टाइम चार वेरिएंट्स उपलब्ध असेल. भारतात फोर्ड फ्रीस्टाइलची टक्कर मारुती सुझुकी इग्निसशिवाय दुसऱ्या क्रॉस हॅचबॅक टोयोटा इटिओस क्रॉस, फिएट अॅवेंच्यूरा, हुंडाई आई 20 अॅक्टिवा सोबत असेल.
इंजिनाचे स्पेसिफिकेशन आणि मायलेज
फोर्ड फ्रीस्टाइममध्ये प्रथमच पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. यात 1.2 लीटर यूनिट लावण्यात आले आहे. हे इंजिन 3 सिलेंडर यूनिटचे आहे. ते 95 बीएचपी पॉवर आणि 120 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, याचे पेट्रोल इंजिन 19 KMPL चे मायलेज देते. पेट्रोल इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत देण्यात आले आहे.
डिझेल कारला 1.5 लीटरचे यूनिट लावण्यात आहे. असेच यूनिट फोर्ड ईकोस्पोर्टला सुध्दा आहे. हे इंजिन 99 बीएचपी पॉवर आणि 215 एनएम टॉर्क जनरेट करेल. कंपनीने म्हटले आहे की, फोर्ड फ्रीस्टाइल डिझेल 24.4 Kmpl मायलेज देईल.
फोर्ड 'Freestyle'चे फीचर्स
या कारमध्ये 6.5 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. ते एप्पलकार प्ले आणि एंड्रॉयड ऑटोसोबत कम्पेटिबल आहे. Freestyle मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स आहेत. त्यात 6 एअरबॅग्स, एबीएस सोबत ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि अॅक्टिव रोलओवर प्रीवेंशन याचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.