Home | Business | Auto | Get international DL to drive car in any other country

विदेशात जायचे आहे, कार चालवायची आहे, तयार करा इंटरनॅशनल DL

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 16, 2017, 12:29 PM IST

मुंबई- विदेशात एखादे वाहन रेंटवर घेऊन फिरायचे असेल तर तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

 • Get international DL to drive car in any other country

  मुंबई- विदेशात एखादे वाहन रेंटवर घेऊन फिरायचे असेल तर तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) तुमच्याकडे असेल तर केवळ १० देशांमध्ये कार चालवता येईल, पण इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर विदेशात कुठेही तुम्ही वाहन चालवू शकता.

  अमेरिका, युरोप, सिंगापूर, हॉंगकॉंग, मलेशिया, श्रीलंका या देशांमध्ये डीएलच्या मदतीने कार चालवता येईल. पण इंटरनॅशनल डीएल असेल तर कुठेही कार चालवता येईल. यासाठी केवळ ५०० रुपयांची फी आधी लागायची. आता ही वाढवून १ हजार रुपये करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की इंटरनॅशनल डीएल बनविण्यासाठी काय करावे लागेल.

  कोण करु शकतो अप्लाय
  - तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे.
  - तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट असलायला हवा.

  हे डॉक्युमेंट हवेत
  इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हवे असेल तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. लायसन्स तयार करताना तुम्हाला या डॉक्युमेंटचे ओरिजनल कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील.
  - फॉर्म ४ए (इंटरनॅशनल डीएचा अॅप्लिकेशन फॉर्म), हा आरटीओ ऑफिस किंवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  - व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्सची अटेस्टेड कॉपी.
  - व्हॅलिड पासपोर्टची अटेस्टेड कॉपी.
  - व्हॅलिड व्हिजाची अटेस्टेड कॉपी.
  - चार पासपोर्ट साईज फोटोग्राफ.
  - मेडिकल फॉर्म 1-A, हा आरटीओ ऑफिस आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  - भारतीय नागरिक असल्याचा पुरावा.

  पुढील स्लाईडवर वाचा, किती द्यावी लागेल फी... काय असेल पद्धत...

 • Get international DL to drive car in any other country

  फी
  - इंटरनॅशनल डीए बनवण्यासाठी १ हजार रुपये फी द्यावी लागेल. तुमच्या एरियातील लोकल ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये ती जमा करावी लागेल.

   

  कोण करेल जारी
  इंटरनॅशनल डीए झोनल ऑफर जारी करते. म्हणजे राज्यातील लोकल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स बनवते.

   

  किती कालावधीसाठी मिळते
  हे लायसन्स एका वर्षासाठी मिळते. त्याच्या आत ते वापरावे लागते. नॉरमल ड्रायव्हिंग लायसन्स आता केवळ ५ वर्षांसाठी बनते.

 • Get international DL to drive car in any other country

  रिन्युअल कधी करावे
  हे लायसन्स रिन्यू होत नाही. याची व्हॅलिडिटी संपल्यावर तुम्हाला नवीन लायसन्ससाठी अप्लाय करावा लागतो.

   

  काय करावे लागेल
  तुम्हाला आधी केलेली प्रक्रिया पार पाडावी लागेल. १ हजार रुपये फी जमा करावी लागेल. सगळी कागदपत्रे द्यावी लागेल. सांगितलेल्या दिवशी आरटीओ ऑफिसमध्ये उपस्थित राहावे लागेल. त्यानंतर हे लायसन्स मिळेल.

Trending