Home | Business | Auto | INDU AUTO ECNM govt clears policy to permit quadricycles like bajaj qute for commercial use in India

आता बाजारात येणार बजाजची QUTE, 1.28 लाख किंमत, 36 चे मायलेज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 03, 2018, 12:01 AM IST

मागील सहा वर्षापासून सरकारी फायलींमध्ये अडकून पडलेली बजाजची क्‍यूट (Qute) लवकरच तुम्हाला रस्त्यावर धावताना द

 • INDU AUTO ECNM govt clears policy to permit quadricycles like bajaj qute for commercial use in India

  नवी दिल्ली- मागील सहा वर्षापासून सरकारी फायलींमध्ये अडकून पडलेली बजाजची क्‍यूट (Qute) लवकरच तुम्हाला रस्त्यावर धावताना दिसणार आहे. ही कार बाजारात दाखल झाल्यावर quadricycle कॅटेगिरीच नव्हे तर भारतीय वाहन क्षेत्रात ट्विस्ट येईल असे म्हटले जात आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने quadricycle च्या व्यावसायिक वापराशी निगडित पॉलिसीच्या ड्राफ्टला मंजूरी दिली आहे. सध्या या कॅटेगिरीत केवळ बजाजची क्यूटच उपलब्ध असणार आहे. quadricycle कॅटेगिरीच्या मंजूरीसाठी लवकरत नोटिफिकेशन येणार आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर बजाजला आपल्या या अतिशय माफक किंमतीमधील कारला भारतीय बाजारात विकण्याची परवानगी मिळणे सोपे जाणार आहे.

  बजाज ऑटोने 2012 मध्ये दि‍ल्‍ली ऑटो शोमध्ये RE60 नावाने ही कार सादर केली. ही कार अनेक आशियाई देशात चांगली लोकप्रिय झाली आहे. कमी किंमत आणि जास्त मायलेज असल्याने तिची प्रतिक्षा अनेक भारतीय करत आहेत.

  प्रदूषणही करते अतिशय कमी
  कंपनीचा दावा आहे की ही कार अतिशय कमी प्रदुषण करते. याचाच अर्थ ही कार अतिशय कमी सीओ2 उत्‍सर्जि‍त करते. या कारमध्ये 216.6 सीसीचे इंजिन असून ती पेट्रोलशिवाय सीएनजी आणि एलपीजी या पर्यायांमध्येही उपलब्ध असणार आहे. या गाडीचा जास्तीत जास्त वेग हा ताशी 70 कि‍लोमीटर असून पीक पॉवर 13.2 पीएस आहे. यात परफॉर्मस आणि कंट्रोलसाठी वॉटर कूल्ड डि‍जि‍टल ट्राय स्‍पोर्ट इग्‍नीशन 4 वॉल्‍व इंजिन लावण्यात आले आहे. या कारचे वजन 450 कि‍लोहून कमी आहे.

  पुढे वाचा: याचे आणखी काही फीचर्स...

 • INDU AUTO ECNM govt clears policy to permit quadricycles like bajaj qute for commercial use in India

  अन्य कारच्या तुलनेत 37 टक्के 

  वजनाने हलकी


  - कंपनीचा दावा आहे की, बाजारात 

  उपलब्ध असणाऱ्या अन्य कारच्या 

  तुलनेने ही कार 37 टक्के हलकी 

  आहे. हलकी असल्याने तुमचे इंधनही वाचते. ही कार मुख्यत: शहरांमधील रस्त्यांसाठी बनविण्यात आली आहे. 

  ही अतिशय कमी जागेत वळते. या 

  कारचा मायलेज एका लीटरमध्ये 36 कि‍लोमीटर आहे. ही कार अन्य 

  लहान कारपेक्षा 37 टक्के कमी 

  कार्बन उत्सर्जन करते. ही एका 

  किलोमीटरला केवळ 66 ग्रॅम CO2 

  सोडते. या कारमध्ये ते सगळे सेफ्टी 

  फीचर्स आहेत जे या सेगमेंटच्या 

  अन्य कारमध्ये असतात. या कारचा टर्निंग रेडियस केवळ 3.5 मीटर 

  आहे. भारतात या कारची किंमत काय असेल हे निश्चित नसले तरी 1.28 लाखाच्या आसपास असेल असे सांगण्यात येत आहे. 

   

   

  पुढे वाचा:  काय म्हणाले होते राहूल बजाज

 • INDU AUTO ECNM govt clears policy to permit quadricycles like bajaj qute for commercial use in India

  राजीव बजाज म्हणाले होते, हे मेड 

  इन इंडिया नाही तर मॅड इन इंडिया


  - पाच वर्ष क्यूट भारतीय बाजारात 

  दाखल करण्यास मंजूरी न 

  मिळाल्याने बजाज कंपनीचे मुख्य 

  कार्यकारी अधिकारी राजीव बजाज हे भारत सरकारवर नाराज झाले होते. 

  फेब्रुवारी 2017 मध्ये नॅसकॉमच्या 

  एका कार्यक्रमात त्यांनी अतिशय 

  कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले होते की, तुमचा कोणताही नवा शोध सरकारी 

  मंजूरीवर अवलंबून असेल तर याला 

  मेड इन इंडिया न म्हणता मॅड इन 

  इंडिया म्हणावे लागेल. पाच वर्ष 

  आम्ही आमची फोर व्हिलर 

  विकण्यासाठी सरकारी मंजूरीची 

  प्रतिक्षा करत आहोत. 

   

  पुढे वाचा: चालवण्यात आले फ्री क्‍यूट अभि‍यान

 • INDU AUTO ECNM govt clears policy to permit quadricycles like bajaj qute for commercial use in India

  चालवले अभियान


  जवळपास 5 वर्षे मंजूरीसाठी प्रतिक्षा केल्यानंतरही ही कार रस्त्यावर धावु शकलेली नाही. याउलट परदेशात 

  तिला केवळ मंजूरीच मिळाली नाही 

  तर ती चांगलीच लोकप्रिय झाली. या कारला मंजूरी मिळावी यासाठी 

  बजाज ऑटोने फ्री क्‍यूट नावाने 

  अभियानही चालवले. कंपनीच्या 

  वेबसाईटवर आजही  #FreeTheQute अभि‍यान सुरु 

  आहे. या लोकांना साथ देण्यासाठी अपील करण्यात आली आहे. यात क्यूटला एका पिंजऱ्यात दाखवण्यात आले आहे. जवळपास 9, 69,743 लोकांनी क्यूटला समर्थन दिले आहे.

 • INDU AUTO ECNM govt clears policy to permit quadricycles like bajaj qute for commercial use in India

Trending