आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hero Electric: लवकरच लॉन्‍च करणार नवी ई-स्‍कूटर, 85 Kmph ची टॉप स्‍पीड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी इलेक्‍ट्रि‍क टू-व्‍हीलर कंपनी Hero Electric लवकरच आपली हायस्पीड  ई-स्‍कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने या प्रॉडक्टच्या परफॉर्मेंस आणि रेंज या दोन्हीवर फोकस केला आहे. Hero Electric ने AXLHE-20 असे कोड  नाव या ई-स्‍कूटरला दिले आहे. ही स्कूटर कंपनीच्या हायस्पीड सीरिज Nyx, Photon आणि Photon 72 V मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.  

 

 

काय असेल टॉप स्पीड
बाईकवालेच्या रिपोर्टनुसार, AXLHE-20 मध्ये 4,000 व्हॅटची मोटर आहे. ती 6,000 व्हॅटची पीक पॉवर जनरेट करते. त्यामुळे स्कूटरचा वेग ताशी 85 किलोमीटर असू शकतो. ती एकदा चार्ज झाल्यावर 100 ते 110 कि‍मी चालेल.

 

 

हे असतील फीचर्स
हिरो ई-स्‍कूटरमध्ये ब्‍लूथुट सोबत मोबाईल कनेक्टिव्हिटी सुध्दा असेल. याशिवाय डेडिकेटेड मोबाईल अॅपद्वारे स्मार्टफोन सपोर्ट इंस्‍ट्रूमेंट कॉनसोल ही मिळेल. याची बॅटरी चार तासात पूर्ण चार्ज होईल.

 

 

नव्या प्रोडक्‍टचा हि‍स्‍सा असेल AXLHE-20  
हिरो इलेक्ट्रिक सेल्स वाढविण्यासाठी 7 ते 8 नवे प्रोडक्‍ट्स लॉन्‍च करणार आहे. AXLHE-20 याचाच एक भाग आहे. कंपनीने 2017-18 या आर्थिक वर्षात 30 हजारहून अधिक इलेक्‍ट्रि‍क स्‍कूटर्स विकल्या आहेत. कंपनीचे उद्दिष्ट यावर्षी आपल्या विक्रीत तीन पट वाढ करण्याचे आहे. कंपनीचे 2022-23 या वर्षासाठी टार्गेट खप 6 लाखावर पोहचविण्याचे आहे.
 

 

पुढे वाचा: हिरो इलेक्ट्रिकचा काय आहे प्लॅन...

बातम्या आणखी आहेत...