आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 10: भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक, सलग दुसऱ्या वर्षी Hero नंबर 1

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टू-व्‍हीलर मॅनुफॅक्‍चरर Hero Motocorp ने आपली बेस्ट सेलिंग बाइक स्प्लेंडरच्या विक्रीसह पुन्हा नंबर एकचे स्थान पटकावले आहे. सोबतच, होंडा अॅक्टिव्हा मे 2018 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांत Hero स्‍प्‍लेंडरने Honda अॅक्‍टि‍व्हाला मागे टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारी 2016 पर्यंत Honda अॅक्‍टि‍व्हा नंबर एकच्या पोझिशनला होते. मार्च 2018 मध्ये Hero स्‍प्‍लेंडरने आपले स्थान परत मिळवले आहे.

 

अशी आहे हिरो आणि होंडाची आकडेवारी...
> हीरो मोटोकॉर्पने मे 2018 मध्ये स्‍प्‍लेंडरचे 2,80,763 युनि‍ट्स विकले होते. तर गतवर्षी एवढ्याच काळात हा आकडा 2,35,852 होता. हिरो स्‍प्‍लेंडरच्या विक्रीत वर्षभरात 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. 
> होंडा मोटरसायक‍ल अॅन्ड स्‍कूटर इंडि‍याने मे महिन्यात अॅक्‍टि‍व्हा स्‍कूटरटे 2,72,475 युनि‍ट्स विकले होते. एका वर्षापूर्वी हा आकडा 2,82,478 इतका होता. या टू-व्हीलरच्या विक्रीत 3.5 टक्क्यांची घट झाली. सोसायटी ऑफ इंडि‍यन ऑटोमोबाइल्स मॅनुफॅक्‍चरर्स (सि‍आम) ने सांगितल्याप्रमाणे, 15 महिन्यांत पहिल्यांदाच या स्कूटरच्या विक्रीत घट दिसून आली आहे. 

 
तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर
तिसऱ्या नंबरवर हिरो मोटोकॉर्पची लोकप्रीय बाइक HF Deluxe आहे. कंपनीने मे 2018 मध्ये या बाइकचे 1,84,131 युनि‍ट्स विकले. गतवर्षी त्यांचा आकडा 1,40,769 होता. 
चौथ्या क्रमांकावर होंडा की सीबी शाइन बाइक आहे. मे महिन्यात सीबी शाइनने हिरो पॅशनला मागे टाकले होते. होंडाने सीबी शाइनचे 99,812 युनि‍ट्स विकले आहेत. 


पुढे वाचा, सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इतर दुचाकी...

बातम्या आणखी आहेत...