आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लॉन्च, सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेली Amaze लॉन्च केली आहे. Amaze च्या पेट्रोल मॉडेलची एक्स शोरुम किंमत 5.59 लाख रुपयांपासून सुरू होते, याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 7.57 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिझेल व्हर्जनची एक्स शोरुम किंमत 8.39 लाख रुपयांपासून सुरू होते, याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 8.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 3 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर गॅरंटी देऊ केली आहे.

 

 

बोल्ड एक्सटीरियर स्टाइल, प्रिमियम इंटीरियर आणि ड्रायव्हिंग परफॉर्मन्स ही Amaze कारची खास वैशिष्ट्ये आहेत. वर्षाच्या सुरूवातीला दिल्लीत झालेल्या Auto Expo 2018 मध्ये होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेल्या Amaze चे अनावरण केले होते.

 

 

इंजिन स्‍पेसि‍फि‍केशन

- होंडा अमेजच्या पेट्रोल वेरि‍एंटमध्ये 1.2 लीटर, 4 सि‍लेंडर इंजन आहे. ते 89 बीएचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्कला जेनरेट करते. 

- या इंजिनाला 5 स्‍पीड मॅन्युअल गि‍अरबॉक्‍स किंवा 7 स्‍टेप सीवीटी ऑटोमॅटि‍कसोबत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

 

मारुतीच्या डिझायरसोबत या गाडीची स्पर्धा
भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुतीच्या डिझायरसोबत या गाडीची स्पर्धा असेल असे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...