Home | Business | Auto | Honda sales narrow gap with no 1 company hero

होंडा नंबर 1 टू-व्‍हीलर कंपनी बनण्याच्या मार्गावर, हिरोला टक्कर

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 16, 2018, 05:23 PM IST

जवळपास एक दशकाहून अधिक काळ भारताची नंबर 1 टू-व्हीलर कंपनी असणाऱ्या हीरो मोटोकॉर्पला पहिल्या स्थानाला धोका नि

 • Honda sales narrow gap with no 1 company hero
  दोन्ही कंपन्यांमधील वाहनांच्या खपाचे अंतर वेगाने कमी होत आहे.

  नवी दिल्ली- जवळपास एक दशकाहून अधिक काळ भारताची नंबर 1 टू-व्हीलर कंपनी असणाऱ्या हीरो मोटोकॉर्पला पहिल्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना हे आव्हान दुसऱ्या कोणत्या कंपनीकडून नसून त्यांची एकेकाळच्या पार्टनर असणाऱ्या होंडा मोटरसायकल आणि स्‍कूटर्स इंडि‍या (HMSI) मिळाले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मेन्‍युफॅक्‍सचर्सच्या (सि‍आम) वतीने जारी आकडेवारीनुसार डोमेस्टिक सेल्स आणि एक्‍सपोर्ट एकत्रित केल्यास दोन्ही कंपन्यांमध्ये फक्त 12 हजार यूनि‍ट्सचे राहिले आहे.

  डोमेस्टिक मार्केटमध्ये हे अंतर 40 हजार यूनि‍ट्स आहे. होंडा मोटरसायकल आणि स्‍कूटर्स इंडि‍या (HMSI) ही सध्या देशातील दुसरी सगळ्यात मोठी टू-व्हीलर कंपनी आहे. होंडाची घौडदौड अशीच सुरु राहिल्यास लवकरच होंडा ही नंबर 1 कंपनी होईल.

  होंडाचा षटकार
  HMSI चे वरिष्ठ उपाध्यक्ष, सेल्स अॅण्ड मार्केटिगचे वाय. एस. गुलेरिया म्हणाले की, होंडासाठी भारत हा एक अतिशय महत्वपुर्ण देश आहे. होंडा टू-व्हीलर्स इंडियाने 2018-19 ची शानदार सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात आम्ही विक्रमी विक्री केली आहे.

  प्रॉडक्शनची कॅपेसिटी ठरली अडसर
  विक्रमी विक्रीनंतरही होंडासाठी प्रॉडक्शनची कॅपेसिटी एक अडचण आहे. होंडाची कॅपेसिटी 64 लाख यूनि‍ट्स आहे. हीरो मोटोकॉर्पची कॅपेसिटी 92 लाख यूनि‍ट्स आहे. हीरोने मार्चमध्ये आपल्या आठव्या प्लॅन्टची सुरुवात केली. त्याची वार्षिक कॅपेसिटी 18 लाख यूनि‍ट्स आहे.

  मोटरसायकलींमध्ये बजाजला सोडले मागे
  होंडाने बजाज ऑटोला मोटारसायकलीच्या सेल्समध्ये मागे सोडले आहे. आकडेवारीनुसार होंडाने डोमेस्टिक मार्केटमध्ये एप्रिल 2018 मध्ये 2,12,292 मोटरसायकली विकल्या. त्यांचा सेल्स ग्रोथ 15.8 टक्के होता. तर बजाज ऑटोचा खप या काळात 2,00,742 यूनिट्स होता. यात 24 टक्के ग्रोथ होता.

  पुढे वाचा...

 • Honda sales narrow gap with no 1 company hero
  मोटरसायकलींच्या खपात होंडाने बजाजलाही मागे टाकले आहे.

Trending