आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात स्पॉट झाली Hyundai i30, ड्रायव्हींगमध्ये चूक झाल्यास देते टी-ब्रेकचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - साऊथ कोरियाची अॅटोमोबाईल कंपनी ह्युंडई लवकरच प्रिमियम हॅचबॅक i30 भारतात लाँच करणार आहे. या कारची टेस्टींगमुकतीच पुण्यात झाली. तेव्हा ही कार दिसून आली. कंपनीने अद्याप कराच्या लाँचिंग किंवा टेस्टींगबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ही कार भारतात लाँच झाल्यानंतर Elite i20 आणि क्रेटा SUV यांच्या मधले व्हेरियंट असेल. या कारचे फोटो Autocar India ने स्पॉट केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार वर्षाच्या अखेरीपर्यंत कार लाँच होणार असून अद्याप किमतीबाबत माहिती समोर आलेली नाही. 


कोरियात अशी आहे Hyundai i30
- ह्युंडई i30 मध्ये सनरूफ आहे. म्हणजे प्रवासादरम्यान तुम्ही ते ओपन करून फ्रेश एअर घेऊ शकतात. 
- कंपनीने याला तीन स्वतंत्र इंजन पॉवर 1.0 लीटर, 1.4 लीटर आणि 1.6 लीटरमध्ये लाँच केले आहे. 
- 1 लीटरचे पेट्रोल व्हेरियंट आहे. तर 1.4 लीटर आणि 1.6 लीटरमध्ये डिझेल व्हेरियंट आहे. 
- यात ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) आहे. कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करण्यात ते मदत करते.
- यात 8 इंचाचे अॅपल कारप्ले इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. त्यात मल्टी कनेक्टीव्हिटी दिलेली आहे. 
- सभी मॉडेलमध्ये 50 लीटरचे फ्युएल टँक आहे. सर्व मिनिमम 6 स्पीड गीअरचे आहेत. 


टी-ब्रेकचा सल्ला देते कार 
- कारमध्ये ड्रायव्हर अटेंशन असिस्ट (DAA) फिचर आहे. ते ड्रायव्हरला अनेक अलर्ट देते. 
- हे फिचर ड्रायव्हींगला सतत मॉनिटर करते. स्टेअरिंग वळवणे, ट्राफिकमध्ये गाडी चालवणे, गीअर बदलने, एक्सेलेटर किंवा ब्रेक लावणे. 
- DAA ला वाटले की ड्रायव्हरकडून काही चूक होत आहे, तर ते ड्रायव्हरला टी-ब्रेकचा सल्ला देते. 
- जर कारची स्पीड जास्त असेल तर स्पीड लिमिटचा अलर्टही दिला जातो. 
- कारच्या मागे चालणारी गाडी मिररमध्ये दिसत नसेल तर ती डिटेक्ट करून ती सेंसरमध्ये अलर्ट देते. 

 

पुढे पाहा, Hyundai i30 चे एक्सटीरियर आणि इंटेरियरचे काही PHOTOS 

 

बातम्या आणखी आहेत...