Home | Business | Auto | India first endogenously developed two seater electric car

600 रुपयांत घरी नेता येईल ही कार, केवळ 50 पैसे प्रति Km येईल खर्च

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 06, 2018, 04:41 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीची स्टार्टअप कंपनी हरिमन मोटर्स एलएलपी टू सिटर इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे.

 • India first endogenously developed two seater electric car

  नवी दिल्ली- दिल्लीची स्टार्टअप कंपनी हरिमन मोटर्स एलएलपी टू सिटर इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे. या कारचे बरेचसे काम झाले आहे. त्याची ड्रायल घेण्यात येत आहे. या कारची बॅटरी RT90 4जी कनेक्‍टेड IoT प्लॅटफॉर्मवर काम करणारी असून एकदा चार्ज झाल्यावर २०० किलोमीटर डिस्चार्ज होणार नाही. ही कार भारतीय रस्त्यांवर आल्यावर ऑटोइंडस्ट्रीजचा चेहरामोहरा बदलेल असे सांगितले जात आहे.

  १० मिनिटांत होईल चार्ज
  एवढेच नव्हे तर या कारची बॅटरी एकचा चार्ज करायला फास्ट डीसी चार्जवर केवळ १० मिनिटांचा वेळ घेईल तर एसी चार्जवर १ ते २ तासांचा कालावधी घेईल. या शिवाय हरिमन मोटर्स दिल्ली एनसीआरमधील सोसायट्यांना चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी आमंत्रित करत आहे. त्यामुळे सोसायटी कॉम्प्लॅक्समध्येच चार्जिंग स्टेशन लावले जातील.

  २०१८ मध्ये येणार कार
  सध्या या कारची रस्त्यावर टेस्टिंग सुरु आहे. २०१८ च्या मध्यंतरी ही कार लॉंच केली जाण्याची शक्यता आहे. या कारची किंमतही कमी राहण्याची शक्यता आहे. ५० पैसे प्रति किलोमिटर दराने ही कार चालवता येईल. या कारच्या ओनरशिप मॉडेलसाठी एक वेगळी योजना आणण्यात येणार आहे. त्या अंतर्गत केवळ ६०० रुपये देवून कार घरी नेता येईल. तुम्ही झिरो डाऊनपेमेंट करुन या कारचे मालक होऊ शकता. त्यानंतर दररोज किंवा महिन्याचा ईएमआय ठरवता येईल.

  या कारचे फिचार्ज आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • India first endogenously developed two seater electric car

  कारला करता येईल ट्रॅक
  ही कार ४जी प्लॅटफॉर्मवर काम करेल. त्यामुळे तिला ट्रॅक करणे किंवा सेंट्रलाईज कंट्रोल फ्रेमवर्कच्या माध्यमातून नियंत्रित करणे शक्य होईल. त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल. तुमची कार कुठे आहे हे माहित करुन घेता येईल. ही कार चोरी जाण्याचा घटना कमी होतील. तसेच नियंत्रणही चांगले राहिल.

   

 • India first endogenously developed two seater electric car

  भाड्यावरही घेता येईल कार
  ही कार तुम्ही भाड्यावरही घेऊ शकाल अशी योजना आणण्यात येणार आहे. तुमच्या घराजवळ असलेल्या स्टेशनमधून ही कार भाड्याने घ्यायची. शहरात तुमचे असलेले काम पूर्ण करायचे. पुन्हा ही कार स्टेशनवर आणून सोडायची. तुमच्याकडून कारचे भाडे घेतले जाईल. किलोमीटरच्या आधारावर ते आकारले जाईल.

   

 • India first endogenously developed two seater electric car

  रिक्षातही येणार क्रांती
  ही कंपनी दोन वर्षात तीन प्रोडक्ट सादर करणार आहे. टू-सिटर इलेक्ट्रिक कार, सहा सिटर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट बस आणि चार सिटर इलेक्ट्रिक कार सामिल आहे. आरटी ट्रान्सपोर्ट बस ५ प्लस १ सिटर असेल. एसीसह ही ५० पैसे प्रति किमी चालेल. या बसमध्ये सेफ्टी, कम्फर्ट, सेक्युरिटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिला ई-रिक्षात कनव्हर्ट करता येईल.

Trending