आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Indian उद्योजकाने घेतली 20 कोटींची कार, त्यावर लावले तब्बल 25 कोटींचे Paint

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नवीन कारला प्रीमियम लुक देण्यासाठी लोक त्यावर अॅक्सेसरीज लावतात. यात मोठा खर्च देखील करतात. परंतु, फ्लोरिडात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन उद्योजकाने हद्दच केली. उद्योजक क्रि‍स सिंह यांनी 20 कोटी रुपये खर्च करून अॅश्टन मार्टिन Valkyrie विकत घेतली. त्या कारला स्पेशल बनवण्यासाठी त्यावर चंद्राची धूळ मिश्रित करून पेंट केले. अपोलो स्पेस मिशनला जाऊन चंद्रावरून पृथ्वीवर परतलेल्या खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राची धूळ आणली होती. चंद्राच्या प्रति ग्रॅम धूळीची किंमत 50 हजार अमेरिकन डॉलर आहे. त्यानुसार, अख्ख्या कारला मून डस्टचा पेंट लावण्यासाठी त्याने 25 कोटी रुपये मोजले आहेत. 

 
अपोलो स्‍पेस मि‍शनची धूळ विकणे किंवा खरेदी करण्यास कायदेशीर बंदी आहे. अपोलो स्पेस मिशनवरून परतलेल्या खगोलशास्त्रींना ती गिफ्ट केली जाते. ते मून डस्ट इतरांना भेट करू शकतात. सोबतच कधी-कधी पृथ्वीवर कोसळणाऱ्या उल्कापिंडमधूनही चंद्राची धूळ सापडू शकते. जि‍योलॉजी.कॉम च्या माहितीनुसार, चंद्राच्या उल्कापिंडची किंमत प्रति ग्रॅम 1000 डॉलर आहे. अशात या उद्योजकाने उल्कापिंडमधून चंद्राची धूळ घेतली तरीही त्याला एकूण 58 लाख रुपये मोजावे लागले असतील. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, या कार आणि पेंटबद्दल अधिक माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...