Home | Business | Auto | govt published final draft of automotive industry standard

80 किमी/तासापेक्षा जास्त वेगाने कार चालविल्यास वाजेल अलार्म, मोदी सरकार आणणार नवा नियम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 26, 2018, 04:11 PM IST

येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा तुमची कार 80 किलोमीटर प्रति तासांपेक्षा अधिक वेग घेतल्यावर कारमध्ये ऑटोमॅटिक अलार्म वाजू लाग

 • govt published final draft of automotive industry standard

  नवी दिल्ली- येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा तुमची कार 80 किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक वेग घेईल तर कारमध्ये ऑटोमॅटिक अलार्म वाजू लागेल. जोपर्यंत तुम्ही कारची स्पीड कमी करत नाही तोपर्यंत तो वाजतच राहणार. रोडावर होणाऱ्या अपघातावर अंकुश लावण्यासाठी मोदी सरकार असा नियम आणत आहे. ज्याचे पालन कार निर्मात्याला करावे लागेल.

  1) तीन ते सहा महिण्यात लागू होऊ शकतो हा नियम
  - सरकारने या नियमांचा फायनल ड्राफ्ट तयार केला आहे.
  - रोड आणि परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, तीन ते सहा महिण्यामध्ये हा नियम लागू होऊ शकतो. या नियमांमध्ये अपघात थांबवण्यासाठी अशा आणखी तरतुदी केल्या जातील.


  2) नवीन सुरक्षा फीचर्स जोडले गेले...
  - रोड आणि परिवहन मंत्रालयाने ऑटोमोटिव इं‍डस्‍ट्री स्‍टॅंडर्डचे फायनल ड्राफ्ट बनवले आहे.
  - यामध्ये कॅटेगिरी एम आणि एन व्‍हीकलसाठी नवीन सुरक्षा फीचर्स जोडले आहे.


  3) काय असेल नवीन सुरक्षा फीचर्स?

  स्‍पीड अलर्ट सिस्‍टम: एम-1 कॅटेगिरी म्हणजे पॅसेंजर व्‍हीकल्समध्ये स्‍पीड अलर्ट सिस्‍टम लावला जाईल. जो ओव्हर स्पीड झाल्यावर ड्राइव्हरला अलर्ट करेल. पोलिस व्‍हीकल्स, अॅम्बुलेंस सोबतच काही वाहनांना सुट दिली जाईल.

  सेफ्टी बेल्‍ट: ड्राइव्हर किंवा त्यांच्या बाजूच्या सिटवर बसलेला व्यक्तीने सिट बेल्ट लावला नाही तर त्याला अलर्ट करण्याची व्यवस्था असेल.

  एअर बॅग: सर्व कारमध्ये कमीत कमी ड्राव्हर एअरबॅग लावने अवश्यक असेल.

  रिव्हर्स पार्किंग अलर्ट: सर्व वाहनांमध्ये व्‍हील रिव्हर्स पार्किंग अलर्ट लावणे अनिवार्य असेल. यामध्ये कारच्या पाठीमागे सेंसर असेल. जो एक निर्धारित रेंजमध्ये कोणत्याही वस्तू किंवा व्यक्ती आल्यावर वाजू लागेल.

  पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे एम आणि एन कॅटेगिरी?

 • govt published final draft of automotive industry standard

  4) काय आहे एम आणि एन कॅटेगिरी?  
  एम कॅटेगिरी: 
  कमीत कमी चार चाकाच्या व्हिकल एम कॅटेगिरीमधअये ठेवल्या आहे.  
  यामध्ये स्टॅडर्ड कार( 2, 3, 4 डोअर) ला सामील केले आहे. 

   

  एम-1 कॅटेगिरी: असे पॅसेंजर व्‍हीकल, ज्यामध्ये 8 सीटपेक्षा अधिक आहे. (यामध्ये एसयूव्ही, कार, व्हॅन, जीप सामिल आहे.) 

  एन कॅटेगिरी: कमीत कमी चार चाकी गुड्स व्‍हीकल (पिकअप ट्रक, व्हॅन, कॉमर्शियल ट्रक सामिल आहे.) 

   

  5) लोकांकडून सुचना
  मिनिस्‍ट्रीने अॅडिशनल सेफ्टी फीचर्सचा फायनल का फायनल ड्राफ्ट मिनिस्‍ट्रीच्या वेबसाइटवर अपलोड केले आहे. यावर 19 एप्रिलपर्यंत सुचला मागवल्या आहेत.  

   

  6) वर्षात 5 लाखांपेक्षा अधिक रोड अपघात होतात...
  - 2015 ते 2016 दरम्यान रोड अपघात संख्या कमी आली आहे. असे मानले जाते की, मोदी सरकारच्या प्रयत्नांनी हे संभव झाले आहे. मात्र आताही वर्षभरात जवळपास 5 लाख  अपघात होत आहे. 

  - 2015 मधअये 5 लाख 1423 अपघात झाले. जे 2016 मध्ये कमी होऊन 4 लाख 80 हजार 652 झाले. 
  - घटना कमी झाल्या मात्र, अपघातांमध्ये मरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2015 मध्ये रोड अपघातामध्ये 1 लाख 46 हजार 133 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2016 मध्ये 1 लाख 50 हजार 785 लोक मरण पावले. यामध्ये जवळपास 35% मृत्यू नॅशनल हायवेवर झाले. 

Trending