आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना पेट्रोल 80Km चे मायलेज देणारी स्कुटर, रिव्हर्स गिअरसह मिळेल कारसारख्या या सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटि डेस्क:- भारताची स्टार्टअप ट्वेंटी टू मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड याच महिन्यात सुरू होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिली इलेक्ट्रॉनीक स्कुटर फ्लो लाँच करणार आहे. गुरुग्राम येथे असलेल्या या स्टार्टअपनुसार स्कुटरमध्ये रिव्हर्सगिअर मिळेल. कंपनीचे CEO आणि को- फाऊंडर प्रवीण खरब यांच्यानुसार, या स्कुटरमध्ये 2.1 KW ची इलेक्ट्रिक मोटार लावली आहे. ज्यामुळे 150  किलोग्रामपर्यंत वजन उचलू शकते. या स्कुटरचे वैशिष्ट्ये म्हणजे 'जिओ फॅसिंग' फिचर आहे. जे एका अॅपच्या मदतीने काम करेल. 

 

'जिओ फॅंसिंग' ने सुरक्षित चालेल गाडी
असे मानले जात आहे की, या फीचरच्या मदतीने ही स्कुटर सुरक्षित रस्त्यावर चालवली जाऊ शकते. जेव्हा या अॅपच्या मदतीने स्कुटरला चालवणे फिक्स होईल, तेव्हा त्याने बाहेर गेल्यावर ऑटोमॅटिक बंद होईल. सोबतच हे फिचर यूजरला याची माहितीही देईल.

 

2 तासांत चार्ज, 80Km चे मायलेज
कंपनीचा दावा आहे की, या गाडीला 2 तासांत फुल चार्ज करुन 80 किलोमीटरपर्यंत चालेल. या स्कुटरची टॉप-स्पीड 60 किलोमीटर प्रती तास असेल. यामध्ये लावलेल्या 2.1KM ची इलेक्ट्रिक मोटार 100 rpm वर 90Nm पीक टॉर्क जनरेट करेल. सध्या कंपनीने किंमतीबद्दल काही माहिती दिलेली नाही. मात्र मिडिया रिपोर्ट्सनुसार 60 ते 70 हजार रुपयांच्या जवळपास सांगितल्या जात आहे.

 

असे असे अन्य फिचर्स़
फ्लो स्कुटरचे अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये महत्त्वाचे फिचर्स म्हणजे रिव्हर्स गेअर मिळेल. मात्र हे कशाप्रकारे काम करेल कसे युजफूल असेल, याबाबत सांगणे सध्या शक्य नाही. याशिवाय कायनेटिक एनर्जी रिकव्हरी सिस्टम, क्रूज कंट्रोल, LED डिजीटल मीटर, LED लाईट्स मिळेल. अॅपच्या मदतीने आपण या स्कुटरला ट्रॅकही करु शकाल.

 

पुढील स्लाइवडर पाहा FLOW ई- स्कुटरचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...