Home | Business | Auto | these 6 cars may discontinue in 2018

या वर्षात 6 कार होऊ शकतात बंद, प्लॅनिंगपुर्वी पाहा लिस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 15, 2018, 03:02 PM IST

शिवाय काही कंपन्याही आपले प्रोडक्ट पोर्टफोलीयो बंद करत आहे. वर्ष 2016 आणि 2017 मध्ये मारुती

 • these 6 cars may discontinue in 2018

  नवी दिल्ली- इंडियन ऑटोमोबाइल मार्केटमध्ये ग्राहकांची आवड वेगाने वाढत आहे. ज्या कारची मागणी होती त्याचांही सेल आता घसरला आहे. याशिवाय काही कंपन्याही आपले प्रोडक्ट पोर्टफोलीयो बंद करत आहे. वर्ष 2016 आणि 2017 मध्ये मारुती, ह्युंडई, होंडा कार्स, रेनो, फोर्ड यांनी पहिलेच आपल्या पोर्टफोलियोमध्ये बदल केला आहे. प्रिमियम हॅचबॅकला घेऊन कॉम्पॅक्ट एसयूव्हीही सामिल केली आहे. या वर्षी हा बदल टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या

  पोर्टफोलियोमध्ये पाहिला जात आहे.

  कंपन्या आपले काही मॉडल्स बंद करुन आपली स्ट्रॅटजी बदलू शकतात. येथे आम्ही अशा मॉडल्सबद्दल बोलत आहोत ज्यांना 2018 मध्ये बंद केले जाऊ शकते.


  महिंद्रा नूवोस्‍पोर्ट
  महिंद्राने आपल्या क्‍वांटोमध्ये काही बदल आणि नवीन फीचर्ससोबत रिब्रांडिंग करुन नूवोस्‍पोर्टला सादर केले होते मात्र इंडि‍यन मार्केटमध्ये या कारला काही खास रि‍स्‍पॉन्‍स मिळाला नाही. 6 महिन्यांमध्येच ही नूवोस्‍पोर्ट फेल झाली आहे. कारण याचा सेल 250 यूनि‍ट्सपेक्षा अधिक होत नव्हता. जानेवारी 2018 मध्ये नूवोस्पोर्टचे केवळ 1 यूनिट विकल्या होत्या. अशामध्ये या वर्षी नूवोस्पोर्टला बंद केले जाऊ शकते.


  पुढील स्लाइडवर वाचा, आणखी कारबद्दल....

 • these 6 cars may discontinue in 2018

  टाटा इंडि‍का

  टाटा मोटर्सकडून टि‍आगोला लाँच केल्यानंतर इंडिकाचा प्रवास संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. टाटा मोटर्सचा पूर्ण फोकस नवीन मॉडल्सवर गेले आहे. अशामध्ये टाटा मोटर्सचा प्रवास वर्ष 2018 मध्ये संपुष्टात येऊ शकतो. टाटा मोटर्सने जानेवरीमध्ये इंडि‍का, व्हि‍स्‍टाच्या केवळ 214 यूनि‍ट्स विकल्या होत्या. याशिवाय याचा सेल्‍स 150 यूनि‍ट्सपेक्षा होत नाही. 

 • these 6 cars may discontinue in 2018

  महिंद्रा व्हेरिटो डिझेल 

  वर्ष 2017 च्या दुसऱ्या सहा महिन्यात महिंद्रा व्हेरिटोच्या पूर्ण सेल्स 300 यूनिट्सही दिला नाही. कारण महिंद्रा इलेक्ट्रिक व्हिकल सेगमेंट सर्वात पुढे आहे. अशामध्ये असे मानले जात आहे की, 2018 मध्ये व्हेरिटोचा केवळ इलेक्ट्रिक व्हर्जनच उपलब्‍ध होईल आणि याच्या डिझेल व्हर्जनला बंद केले जाईल.

 • these 6 cars may discontinue in 2018

  टाटा बोल्‍ट

  टाटा बोल्‍टची स्थिती टि‍आगो-टि‍गोरच्या लाँचनंतर खराब झाली आहे. कारण ही सारखी प्राइस सेगमेंटची कार आहे. बोल्‍टची सरासरी सेल्‍स केवळ 200 यूनि‍ट्स आहे आणि कंपनीकडून या कारचे कुठल्याही प्रकारचे प्रमोशन केले जात नाही. वर्ष 2018 मध्ये या करचा प्रवास संपण्याची शक्याता आहे.

 • these 6 cars may discontinue in 2018

  महिंद्रा झायलो

  महिंद्राने मल्‍टी पर्पस व्‍हिकल झायलोला वर्ष 2009 मध्ये लाँच केले होते.  त्यावेळी कारला अधिक यश मिळाले होते.  मात्र नंतर मर्यादित अपडेट, जुन्या 2.5 लीटर   इंजिन आणि कस्टमर्सची पसंतीचे कारणाने याचा सेल्स घसरु लागला आहे. जानेवारी 2018 मध्ये झायलो   सेल्स 677 यूनि‍ट्स   राहिली आहे. गेल्या 4 महिन्यात सर्वात अधिक आहे. असे मानले जात आहे की, 2018 मध्ये महिंद्रा झायलोला बंद करुन नवीन टियूव्ही 500 लाँच केली जात आहे.  

 • these 6 cars may discontinue in 2018

  टाटा इंडि‍गो

  टाटा टि‍गोर आणि टाटा जेस्‍टच्या आल्यानंतर टाटा इंडि‍गोचा प्रवास संपताना दिसत आहे. टाटा मोटर्सचे पूर्ण फोकस नवीन मॉडल्‍सवर गेले आहे. कंपनी वेगाने आपली स्थिती बदलत आहे. ग्राहकही अधिक स्टायलिश आणि पॉवरफुल कार खरेदी करणे पसंत करत आहे. यामध्ये इंडि‍गो कोठेच फिट बसत नाही.

Trending