Home | Business | Auto | maruti bet on cng and hybrid but Honda thinks its a challenge

इको फ्रेंडली कारसाठी ऑटो इंडस्‍ट्रीत स्पर्धा, होंडाने स्वीकारले आव्हान

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 01, 2018, 10:31 AM IST

भारतात ग्रीन आणि क्लीन ऑटोमोबाइल टेक्‍नोलॉजीच्या मुद्द्यावर सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. देशातील सगळ्यात मो

 • maruti bet on cng and hybrid but Honda thinks its a challenge
  मारुती आता नव्या टेक्‍नोलॉजीवर काम करत आहे.

  नवी दिल्ली- भारतात ग्रीन आणि क्लीन ऑटोमोबाइल टेक्‍नोलॉजीच्या मुद्द्यावर सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडि‍याने (MSI) म्हटले आहे की, ते विविध प्रकारच्या वैकल्पिक टेक्नोलॉजीवर काम करत आहेत. यात इलेक्‍ट्रि‍क, सीएनजीवर चालणाऱ्या कारचा समावेश आहे. तर जपानची कार कंपनी होंडाने आपली भारतीय उपकंपनी होंडा कार इंडियाला कळवले आहे की, भारतात याबाबत स्पष्ट पॉलिसी नसल्याने इको फ्रेंडली तंत्रज्ञान विकसित करणे हे मोठे आव्हान आहे.

  मारुतीचे काय आहे म्हणणे
  MSI चे चेअरमन आर. सी. भार्गव म्हणाले की, आम्ही सीएनजी, हायब्रीड आणि दुसऱ्या पर्यायी तंत्रज्ञानाच्या वापरावर कार करत आहोत. आम्ही केवळ एका तंत्रज्ञानापुरते सीमित राहणार नाही. आम्ही सगळ्याच तंत्रज्ञानावर भर देत आहोत. आम्ही ऑईल इंपोर्ट आणि वायू प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

  जे सरकारचे ध्येय तेच आमचे ध्येय: मारुती
  भार्गव म्हणाले की, आमचा विचार तो आहे जो सरकारचा आहे आम्ही आमचे लक्ष बॅटरी कॉस्ट कमी करण्याऐवजी दुसऱ्या तंत्रज्ञानावर केंद्रीत केले आहे. आम्ही सीएनजीचाही अतिशय गांभीर्याने विचार करत आहोत.

  होंडाने म्हटले आहे की, स्पष्ट पॉलिसी नाही
  होंडा कार इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि डायरेक्टर मार्केटिग आणि सेल्स राजेश गोयल म्हणाले की, 2030 पर्यंत आमचे प्रोडक्शन हे गैरपरंपरागत, हायब्रिड प्लन इन किंवा इलेक्ट्रिक किंवा फ्यूल सेलचे असेल. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आहे. भारताकडे याबाबत ठोस पॉलिसी नसल्याने नक्कीच काय करायचे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. तंत्रज्ञान ही आमच्यासाठी तरी समस्या नाही.

  पुढे वाचा:

 • maruti bet on cng and hybrid but Honda thinks its a challenge
  होंडाकडे सगळ्या पध्दतीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

Trending