Home | Business | Auto | Maruti Suzuki top 6 flop cars so far

या आहेत मारुतीच्या 6 सुपर फ्लॉप कार, इम्प्रेस करण्यात ठरल्या फेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2017, 11:31 AM IST

नवी दिल्ली- देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने अनेक सुपर हिट कार बाजारपेठेत आणल्या आहेत.

 • Maruti Suzuki top 6 flop cars so far

  नवी दिल्ली- देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने अनेक सुपर हिट कार बाजारपेठेत आणल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही घरात कार विकत घ्यायची तर मारुतीचे नाव आधी निघते. पण या कंपनीने केवळ हिट कार दिल्या असे नाही. काही फ्लॉप कारही या कंपनीने बाजारपेठेत आणल्या होत्या. या कार ग्राहकांना इंम्प्रेस करण्यात कमी पडल्या. त्यानंतर मारुतीला या कार्सचे प्रोडक्शन बंद करावे लागले. आज आम्ही तुम्हाला मारुतीच्या अशा फ्लॉप कारची कहाणी सांगणार आहोत.

  मारुती बलेनो अल्टूरा
  स्टेशन वॅगनला विकण्यात अनेक कंपन्या फेल झाल्या आहेत. फियाट आणि टाटा यानंतर मारुतीने बलेनो अल्टूरा लॉंच केली होती. ती स्टेशन वॅगन बेस्ड कार होती. पण ही कारही फार वाईट पद्धतीने फेल ठरली. भारतीय बाजारपेठ या कारसाठी तयार नव्हती. त्यामुळे या कारचा सेल वाढला नाही. हिची किंमत ७.५ लाख रुपये होती. त्यावेळी ती फारच जास्त होती. याच धर्तीवर लॉंच करण्यात आलेली मारुती बेलेनो मात्र प्रचंड लोकप्रिय कार ठरली आहे.

  कधी आली- १९९९
  कधी बंद- २००५

  पुढील स्लाईडवर बघा, अशाच काही कार... या मारुतीच्या कार ठरल्या सुपर डुपर फेल...

 • Maruti Suzuki top 6 flop cars so far

  मारुती इस्टीलो
  २००७ मध्ये मारुती इस्टीलो लॉंच करण्यात आली. झेन या मॉडेलचे अॅडव्हान्स व्हर्जन म्हणून ती बाजारपेठेत आणली होती. पण ती झेनची उत्तराधिकारी ठरु शकली नाही. २००९ मध्ये तिला अपडेट करुन पुन्हा लॉंच करण्यात आले. पण या कारची अॅॅव्हरेज सेल्स केवळ ८५० युनिट्स राहिली होती.

 • Maruti Suzuki top 6 flop cars so far

  मारुती ए-स्टार
  मारुती सुझुकीने नोव्हेंबर २००८ मध्ये ए-स्टार भारतात लॉंच केली होती. या कंपनीने इतर देशांमध्ये नेक्स्ट जेन ऑल्टोच्या नावाने विकली होती. ए-स्टार मॉडेलला निस्सान युरोपसह केलेल्या करारात पिक्सो नावाने विकण्यात आले. पण ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली.

 • Maruti Suzuki top 6 flop cars so far

  मारुती सुझुकी ग्रॅंड व्हिटारा
  मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत जापान येथून सीबीयू रुटच्या माध्यमातून ग्रॅंड व्हिटारा सादर केली होती. तिची किंमत फार जास्त होती. त्यावेळी तिची किंमत २० लाख रुपये होती. या कारची सेल फार कमी राहिली. तिला बंद करावे लागले.

 • Maruti Suzuki top 6 flop cars so far

  मारुती सुझुकी किजाशी
  मारुतीने किजाशीसह लग्झरी कार बाजारपेठेत एन्ट्री केली होती. पण स्मॉल कारवर चांगली पकड अलेली ही कंपनी या सेगमेंटमध्ये फेल ठरली. किजाशीची किंमत १८ लाख रुपये होती. हिला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही ट्रान्समिशनसह उपलब्ध करण्यात आले होते.

 • Maruti Suzuki top 6 flop cars so far

  मारुती वरसा
  २००१ मध्ये मारुतीने एमपीव्ही सेगमेंटमध्ये वरसा ही कार लॉंच केली होती. वरसा लॉंच झाल्याबरोबरच फ्लॉप ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना या कारचे प्रमोशन सोपविण्यात आले होते. या कारला २००९ मध्ये बंद करण्यात आले. १.३ लीटर पेट्रोल इंजिनसह सादर केलेली ही कार फेल ठरली.

Trending