Home | Business | Auto | pak drive those car which ever already launched in India

Cars: या 4 कारची भारतीयांना आहे प्रतिक्षा, ज्या चालवत आहेत पाकिस्तानी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 16, 2018, 10:23 AM IST

भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. हेच कारण आहे की जगातील अनेक कंप

 • pak drive those car which ever already launched in India

  नवी दिल्ली- भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. हेच कारण आहे की जगातील अनेक कंपन्या भारतात आपले ऑपरेशन सुरु करण्यास उत्सुक आहेत. तर सध्या असलेल्या कंपन्या आपले ग्लोबल मॉडेल भारतीय बाजार भारतात दाखल करण्यास उत्सुक आहे. अशा अनेक कार आहेत ज्यांची विक्री भारतात सुरु होण्यापूर्वीच त्यांची विक्री पाकिस्तानात होत आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही कारविषयी माहिती देत आहोत.

  Honda Civic
  जपानची कार कंपनी होंडाने होंडा सिव्हिकच्या सध्या असलेल्या जनरेशनच्या येणाऱ्या फेसलिफ्ट व्हर्जनला ऑटो एक्स्पो 2018 मध्ये शोकेस केले होते. ही कार भारतात पुढील वर्षी येईल. पण पाकिस्तानात होंडा सिव्हिकचे 10 वे जनरेशन आलेले आहे. या कारमध्ये 1.8 लीटर इंजिन आहे. येथे होंडा सिव्हिकची किंमत 24.99 लाख पाकि‍स्‍तानी रुपये आहे.

  भारतात होंडा अनेक मॉडेल्स करणार दाखल
  ऑटो एक्‍स्पो 2018 दरम्यान कंपनीने म्हटले होते की होंडाच्या वैश्विक विक्रीत ऑटोमोबाईल प्रोडक्टची संख्या 53 लाख आहे. यात भारताचे योगदान बरेच मोठे आहे. आम्ही येत्या 3 वर्षात भारतात 6 मॉडल लॉन्‍च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यातील 3 मॉडेल आम्ही या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करणार आहोत.

  पुढे वाचा...

 • pak drive those car which ever already launched in India

  Kia Grand Carnival


  कंपनी आपल्या कार 2019 पासून विकण्यास सुरुवात करणार आहे. कोरियाची ही कंपनी यापूर्वीच पाकिस्तानत दाखल झालेली आहे. Kia मोटर्स पाकि‍स्‍तानात आपली पॉप्युलर कार Kia Grand Carnival विकत आहे. या कारमध्ये 3342 सीसी इंजिन आहे. ते 270 पीएस पॉवर जनरेट करते. याशिवाय ही कार फीचर्स आणि कम्फर्टसाठीही बरीच चांगली आहे. पाकिस्तानात या कारची किंमत 39.99 लाख पाकि‍स्‍तानी रुपये आहे. भारतात Kia मोटर्सला फेब्रुवारीमध्ये ऑटो एक्‍सपो 2018 मध्ये दाखवण्यात आले होते. 
   

  पुढे वाचा...

 • pak drive those car which ever already launched in India

  Suzuki Jimny


  भारतात विकल्या जाणाऱ्या मारुती जिप्सीचे पहिल्या जनरेशनचे वेगळे वर्जन जिम्नी आहे. जिम्नीचे नवे मॉडेल अजुन भारतात आलेले नाही. पण ते पाकिस्तानात उपलब्ध आहे. जिम्नी ही एक लहान, कॉम्पॅक्ट एसयूवी आहे. यात  G13 1.3 पेट्रोल इंजिन आहे जे जिप्सीत होते. हे इंजिन 80 बीएचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्क जेनरेट करण्याची क्षमता बाळगते.

   

  पुढे वाचा...

 • pak drive those car which ever already launched in India

  Suzuki Vitara


  सुझुकी विटाराला भारतात अनेक वेळा टेस्टिंग करताना पाहिले गेले आहे. कंपनीने हे अजुन कन्फर्म केलेले नाही. ही कार आता भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. पण ही कार पाकिस्तानात उपलब्ध आहे. विटाराचा आकार ह्युंडई क्रेटाहून अधिक लहान आहे. पाकिस्तानात असणाऱ्या सुझुकी विटारामध्ये 1.6 लीटर चार सि‍लेंडर पेट्रोल इंजिन आहे. ते 115 बीएचपी पॉवर जनरेट करते.  
   

Trending