Home | Business | Auto | SUV Maruti Suzuki Vitara Brezza adds glamour with enhanced look AGS option

व्हिटाराब्रेझा एजीएसचा पर्यायासह आणखी देखण्या, नव्या रुपात दाखल

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2018, 05:20 PM IST

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (एमएसआयएल) आज आपली धमाकेदार एसयूव्ही व्हिटाराब्रेझा एका नवीन, आणखी देखण्या रुपात सादर केल

  • SUV Maruti Suzuki Vitara Brezza adds glamour with enhanced look AGS option
    नवी दिल्ली- मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (एमएसआयएल) आज आपली धमाकेदार एसयूव्ही व्हिटाराब्रेझा एका नवीन, आणखी देखण्या रुपात सादर केली. शिवाय या नव्या रुपातील व्हिटाराब्रेझामध्ये अत्यंत सोयीस्कर म्हणून मान्यता पावलेल्या ऑटो गिअर शिफ्ट अर्थात एजीएसचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
    देशातील या सर्वांत लोकप्रिय एसयूव्हीच्या अंतर्गत तसेच बाह्य रुपांत मोठ्या प्रमाणात बदल करून ती अधिक ठळक आणि दमदार करण्यात आली आहे. नवीन अलॉय चाकांना चकाकती ब्लॅक फिनिश देण्यात आली आहे. गाडीच्या एकंदर रुपाला पूरक ठरावे म्हणून पुढील ग्रिल व मागील दारेही क्रोमियममध्ये करण्यात आली आहेत आणि हे वैशिष्ट्य सर्व व्हेरिएंट्समध्ये समान ठेवण्यात आले आहे. शहरात चालवण्यासाठी म्हणून अत्यंत आटोपशीर ठेवण्यात आलेल्या या एसयूव्हीची अंतर्गत सजावटही नव्याने करण्यात आली असून, काळ्या रंगाची थीम यासाठी वापरून त्याला पूरक अशा सर्व बाबी ठेवण्यात आल्या आहेत.
    एमएसआयएलचे क्रांतीकारी टू-पेडल तंत्रज्ञान, ऑटो गीअर शिफ्ट, आता व्हिटाराब्रेझामध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्हिटाराब्रेझाची कामगिरी पूर्ण क्षमतेने व्हावी यासाठी ड्रायव्हिंगच्या विविध प्रकारांचे सखोल संशोधन करून हे तंत्रज्ञान या गाडीत बसवण्यात आले आहे.
    नवीन व्हिटाराब्रेझा ग्राहकांकडे सोपवताना एमएसआयएलचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि विक्री) आर. एस. कलसी म्हणाले: “व्हिटाराब्रेझाने भारतातील एसयूव्ही बाजारपेठेची गणिते बदलून टाकली आहेत. तरुण ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही तिचे रूप आणखी आकर्षक केले आहे. तिचा सोयीस्करपणा वाढवण्यासाठी आम्ही तिच्यात आता ऑटो गीअर शिफ्ट हे आमचे मान्यताप्राप्त तंत्रज्ञानही उपलब्ध करून दिले आहे. एजीएसला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मारुती सुझुकीच्या सर्व श्रेणींमध्ये एजीएस प्रकारांतील गाड्यांची विक्री गेल्या तीन वर्षांत तिप्पट झाली आहे. हे तंत्रज्ञान व्हिटाराब्रेझामध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे त्याचप्रमाणे ती नवीन डिझाइनमध्ये सादर केल्यामुळे, भारतातील ही पहिल्या क्रमांकाची एसयूव्ही अधिक आकर्षक होईल, अशी अपेक्षा आम्हाला आहे.”

  • SUV Maruti Suzuki Vitara Brezza adds glamour with enhanced look AGS option

Trending