आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tata Motors: किती वेगळी आहे भारतीय लष्कराची सफारी? कंपनीने सुरू केली डिलिव्हरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडि‍यन आर्मीने तयार केलेली टाटा सफारी स्‍टोर्म. ( इमेज: Tejas-India\'s MRCA) - Divya Marathi
इंडि‍यन आर्मीने तयार केलेली टाटा सफारी स्‍टोर्म. ( इमेज: Tejas-India\'s MRCA)

नवी दिल्ली- टाटा मोटर्सने इंडियन आर्मीला सफारी स्टोर्मची डिलिव्हरी सुरु केली आहे. भारतीय लष्कराने आपल्या हालचालींसाठी कठीण परिस्थितीतही चालू शकतील अशा वाहनांसाठी टाटा मोटर्स आणि अन्य कंपन्यांची निवड केली होती. आता टाटा मोटर्सने आपल्या सफारी स्टोर्म या वाहनाची डिलिव्हरी सुरु केली आहे. टाटा मोटर्स भारतीय लष्कराला 3,192 वाहने देणार आहे. टाटा स्टोर्म मारुती जिप्सीला रिप्लेस करणार आहे. 

 

 

टाटा स्टोर्मने लष्कराकडून घेतलेल्या सर्व चाचण्या पास केल्या आहेत. भारतीय लष्कराला अशी वाहने हवी होती जी 800 कि‍लोग्रॅम वजन उचलू शकतील. याशिवाय टॉप रुफ हार्ड असून त्यात एसी असावा. टाटा शिवाय निसान आणि महेंद्रा या कंपन्याही लष्कराला वाहने पुरविणार आहेत.

 

 

सर्वसामान्यांची सफारी आणि या वाहनात काय अंतर
सर्वसामान्यांच्या सफारीत आणि या सफारी केवळ कलर हेच अंतर नसून इतर अनेक फरक आहेत. आर्मीसाठी बनविण्यात आलेल्या सफारी स्टोर्ममध्ये ग्रीन पेन्ट आहे. हेडलॅम्प प्रोजेक्टमधील लाईटला हॉरिझोन्टल बीम आहे. शत्रुसैन्याला ही वाहने रात्रीच्या वेळी दिसू नयेत यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मागील बाजुस हुक देण्यात आले असून रेडिओ अॅन्टेना देण्यात आला आहे. इतकेच नाही तर या कारमध्ये अंडर बॉडी प्रोटेक्शनसोबत अपरेटेड सस्पेंशन आहे.

 

 

का आहे टाटा सफारी स्टोर्म GS800 असे नाव
टाटा सफारी स्टोर्म GS800 इंडि‍यन आर्मीसोबत जोडली जाणार आहे. ती मारुती जिप्सीला रिप्लेस करणार आहे. GS चा अर्थ 'जनरल सर्वि‍सेज' असा आहे तर 800 अर्थ किलोग्रॅम उचलण्याची क्षमता असा आहे. इंडियन आर्मीचे वर्क डिव्हिजन त्या क्षेत्रांवर विचार करत आहे जिथे GS800 चा वापर केला जातो.
 

पुढे वाचा:

 

बातम्या आणखी आहेत...