आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- एक वर्षापुर्वी टाटा मोटर्सला भारतीय लष्कराने सफारी स्टोर्मच्या 3,192 यूनिट्सही ऑर्डर दिली होती. ही गाडी भारतीय लष्करात असलेल्या सुझुकी जिप्सीची जागा घेईल. टाटा सफारी स्टोर्मने भारतीय लष्कराच्या अपेक्षांची पुर्ती करत त्यात हार्ड टॉप, 800 किलोग्रॅम पेलोड कॅपेसिटी आणि एअर कंडीशनिंगचा सामील केले आहे.
सफारी स्टोर्म एसयूवीने सस्पेंशनवर दुसऱ्यादा काम केले आहे. यात प्रोटेक्टिव अंडरबॉडी आणि 4X4 ड्राइव्ह सिस्टमचा समावेश आहे. आता या सफारी स्टोर्मचे फोटो आणि माहिती समोर आली आहे.
काय आहे याचे नाव
टाटा सफारी स्टोर्म GS800 भारतीय लष्करात दाखल झाल्यानंतर मारुती जिप्सी हटविण्यात येणार आहेत. भारतीय लष्कर त्या क्षेत्रांचा विचार करत आहे ज्या ठिकाणी GS800 चा वापर करता येईल. यात GS चा अर्थ जनरल सर्विसेज तर 800 चा अर्थ किलोग्रॅममध्ये व्हीकलचे पेलोड उचलण्याची क्षमता असा आहे.
डिझाईनविषयी
सफारी स्टोर्म GS800 मध्ये दोन डोअर कॅबिन डिझाईन सोबत एअर कंडीशनिंग देण्यात आले आहे. याशिवाय कारच्या मागील बाजूस लोक बसू शकतात. तेथे उपकरणेही ठेवता येतील. याच्या मागील बाजूस अॅण्टेना आणि दुर्बीण सुध्दा आहे.
पुढे वाचा: स्पेसिफिकेशनविषयी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.