Home | Business | Auto | these cars coming back to India

भारतात परतत आहेत या कार, 4-5 वर्षापुर्वी झाल्या होत्या बंद

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 02, 2018, 11:30 AM IST

प्रीमि‍यम आणि लग्‍झरी सेगमेंटमध्ये तेजी पाहायला मिळत असल्याने कंपन्या आपल्या जुन्या कार पुन्हा बाजारात लॉन्च

 • these cars coming back to India

  नवी दिल्ली- प्रीमि‍यम आणि लग्‍झरी सेगमेंटमध्ये तेजी पाहायला मिळत असल्याने कंपन्या आपल्या जुन्या कार पुन्हा बाजारात लॉन्च करत आहेत. कमी मागणी असल्याने यातील काही कार बंद करण्यात आल्या होत्या. पण आता वातावरण बदलल्याने या कार पुन्हा एकदा बाजारात दाखल होत आहेत. कंपन्यांचे म्हणणे आहे की भारतीय ऑटोमोबाइल बाजारात वेगाने बदल होत आहे आणि ग्राहकांची पसंतीही बदलत आहे.

  होंडा सिविक
  होंडा सि‍वि‍क कंपनीच्या आयकॉनि‍क कारपैकी ही एक कार होती. ती नव्या जनरेशनच्या ऑटो एक्‍सपो 2018 मध्ये सादर करण्यात आली होती. होंडा कार्स इंडियाने 2006 मध्ये सिविक लॉन्च केली. या कारला होंडा सिटी आणि एकॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मागणी कमी असल्याने 2012 मध्ये ही कार बंद करण्यात आली. यावर्षी होंडा दुसऱ्यादा आपली लक्झरी सेडान सिविक कार लॉन्च करणार आहे. हे होंडा सिविलचे 10 वे जनरेशन आहे.

  भारतात निर्माण झालेल्या होंडा सिविकमध्ये 1.5 लीटरचे डिझेल इंजिन आहे. तर पेट्रोल वर्जनमध्ये 1.8 लीटर आय-वीटेक इंजिन असेल. हिला 6 स्पीड मॅन्युअल अथवा सीवीटी ऑटोमॅटिकसोबत उपलब्ध करुन देण्यात येईल.

  पुढे वाचा...

 • these cars coming back to India

  निसान एक्स-ट्रेल
  निसानने 2016 ऑटो एक्‍स्पो मध्ये एक्स ट्रेलच्या तिसऱ्या जनरेशनला शोकेस केले होते. या कारचा याच वर्षी लॉन्च करण्यात येणार आहे. ही नवी एक्स-ट्रेल देशातील पहिली हायब्रिड एसयूवी आहे. ही कार डिझेल वर्जनमध्ये नसेल. फेब्रुवारी 2014 मध्ये निसानने एक्‍स-ट्रेल आणि 370 जेड कूपेची विक्री बंद केली होती. 

   

  पुढे वाचा: आणखी माहिती

 • these cars coming back to India

  ह्युंडई सेंट्रो
   
  ह्युंडई इंडि‍याने आपली पॉप्युलर हॅचबॅक कार सेंट्रोची विक्री 2014 मध्ये बंद केली होती. कंपनी ही कारला 2018 मध्ये पुन्हा एकदा लॉन्‍च करण्याच्या तयारीत आहे.ही कार ईऑन आणि ग्रॅन्ड आय 10 च्या मधील असेल. नवी सेंट्रो टॉल बॉय (ऊंची) कार असेल आणि ती पहिल्यापेक्षा मोठी असेल. तिच्या इंटीरि‍यरला सुध्दा बदलण्यात येणार आहे. 

   

Trending