Home | Business | Auto | these used car you can buy at cost of scooter

स्‍कूटरच्या किंमतीत खरेदी करा कार, जाणून घ्या कसे ते...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 21, 2018, 03:23 PM IST

कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या अनेकांना ती आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते पण आम्ही तुम्हाला स्कुटरच्या किंमतीत कार

 • these used car you can buy at cost of scooter

  नवी दिल्ली- कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या अनेकांना ती आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते पण आम्ही तुम्हाला स्कुटरच्या किंमतीत कार खरेदी करण्याविषयी माहिती देत आहोत. होय तुम्ही अॅक्टिव्हा किंवा ज्युपिटरच्या किंमतीत कारही विकत घेऊ शकता. मार्केटमध्ये अगदी 50 हजार ते 70 हजार एवढ्या किंमतीतही सेकंड हॅण्ड कार मिळत आहेत. अशाच काही ऑप्शनची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत


  मारुती 800
  मारुती 800 ही जु्न्या हॅचबँकपैकी एक आहे. ही कार दोन दशकाहून अधिक काळापासून बाजारात आहे. स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून आजही मध्यमवर्ग या कारकडे पाहतो. याचा देखभाल खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतो. अनेकांची पहिली कार ही मारुती 800 असते आणि तिची रिसेल व्हॅल्यूसुध्दा चांगली मिळते. तुम्हाला ऑनलाईन किंवा सेकंड हॅण्ड कार बाजारात ती अतिशय कमी किंमतीत म्हणजेच 50 ते 60 हजारात ती मिळू शकते.

  पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन

 • these used car you can buy at cost of scooter

  झेन
  मारुती झेन पहिली हॅचबॅक कार होती जी पॉवरफुल म्हणून ओळखली जात होती. तिच्या एक लीटरचे इंजिन आहे. हे इंजिन 50 बीएचपी पॉवरचे आहे. या कारमध्ये चांगला स्पेस असून ही कार चालवणे एक चांगला अनुभव असतो. ही कारही तुम्हाला 50 ते 85 हजारात मिळू शकते. 


  पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन

 • these used car you can buy at cost of scooter

  ह्युंडई सेंट्रो
  भारतात ह्युंडईची पहिली कार सेंट्रो होती. ही पहिली टॉल बॉय हॅचबॅक होती. सेट्रो ही आजही भरवशाची कार म्हणून ओळखली जाते. ही चालवणे आणि वापरणे अतिशय सोपे मानले जाते त्यामुळेच ड्रायव्हिंग स्कूलपासून कार चालवणे शिकणारे या कारला आपली पहिली पसंती देतात. ही कार 50 ते 70 हजारात बाजारात मिळते. 

   

   

  पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन
   

 • these used car you can buy at cost of scooter

  टाटा इंडिका
  टाटाची पहिली हॅचबॅक इंडिका होती. जास्त स्पेस असलेली हॅचबॅक अशी इंडिकाची ओळख होती. इकोनॉमिकल कार म्हणूनही ती ओळखली जात होती. इंडिकाच्या या वैशिष्टयामुळे तिचा कॅब म्हणूनही वापर करण्यात आला.  

   

Trending