आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एका व्यक्तीसाठी बनली आहे ही स्टायलिश, पॉवरफुल स्कूटर, इतकी आहे किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क- भारतीय ऑटो मार्केटमध्ये स्कूटरची मोठी उपलब्धता आहे. जवळपास सगळ्याच ऑटो कंपन्या स्कूटर बनवत आहेत. या होंडाची पॉवरफूल अॅक्टिवा, सुझुकीची अॅक्सिस, हिरोची डुएट समवेत TVS, यामाहा आणि अन्य कंपन्यांच्या स्कूटरचा समावेश आहे. या सगळ्या स्कूटर 2 सीटर आहेत. यामाहाची एक स्कूटर अशीही आहे जी सिंगल सीटर आहे. कंपनी ती अजून भारतात लॉन्च केलेली नाही. यामाहाच्या या स्कूटरचे नाव  Yamaha 50cc Vino असे आहे. दिसण्यास स्टायलिश आणि दमदार असणाऱ्या या स्कूटरमध्ये अनेक फीचर्स आहेत.

 

 

# लहान स्कूटरचा मोठा टॅंक 
यामाहा Vino दिसण्यास लहान आहे. यात 4.5 लीटरचे पेट्रोल टॅंक देण्यात आले आहे. भारतात अशा स्कूटर या टू सीटर आहेत त्यात 4.5 लीटर से 5.5 लीटरचे फ्यूल टॅंक आहे. त्यात 49cc चे लिक्विड-कूल्ड 4-स्ट्रोक SOHC इंजिन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एका लीटर पेट्रोलमध्ये 45 किलोमीटर मायलेज देते. ही ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सोबत येते. 

 

 

# असे फीचर्सही मिळतील 
ही स्कूटर आकाराने लहान असली तरी यात लेग स्पेस पुर्ण मिळेल. या सीटची लांबी आणि रुंदी इतकी आहे की एक व्यक्ती आरामात यावर बसू शकते. स्कूटरमध्ये अलॉय व्हील सोबत टेलीस्कोप सस्पेंशन देण्यात आले आहे. तर मागे आणि पुढे ड्रम ब्रेक्स आहेत. यात फ्यूल टॅक मागे देण्यात आला आहे. डिजिटल मीटर, मोबाईल लॉकर चार्जरसोबत सीटच्या खाली हेल्मेटसाठी स्पेस देण्यात आला आहे. नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये याची किंमत $ 2299 म्हणजे 1,53,542 रुपये आहे. या डीप सी ब्ल्यू आणि व्हॅनिला व्हाईट हे रंग देण्यात आले आहेत. 

 

 

पुढे पाहा: या स्टायलिश स्कूटरचे काही फोटो

 

 

बातम्या आणखी आहेत...