आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली सुपरबाईक रेसर अलिशा अब्दुल्ला, फोटो पाहाल तर पाहातच राहाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार-बाईक रेसिंगमध्ये आता महिला देखील मागे राहिलेल्या नाहीत. महिला रेसर्समध्ये सर्वात आधी नावे घेतले जाते, ते म्हणजे अलिशा अब्दुल्ला हिचे. अलिशा भारताची पहिली एकमात्र सुपरबाईक रेसर आहे. मात्र, अलिशाचे फोटो पाहिलेत तर ती तुम्हाला एक स्टायलिश मॉडेल वाटेल. कारण तिचे राहिणीमान बोल्ड आहे. तसेच ती फास्टेस्ट इंडियन वुमन कार रेसर देखील आहे.

अलिशा ही प्रसिद्ध बाइक रेसर आर.ए. अब्दुल्ला यांची कन्या आहे. आर.ए. अब्दुला हे 7 वेळा नॅशनल चॅम्पियन राहिले होते. अलिशाने बालवयातच (नऊ वर्ष) रेसिंग सुरु केले होते. वडिलांकडून तिला पहिली बाईक मिळाली होती. अलिशाने वयाच्या 11 वर्षीच गो-कार्टिंग रेसिंग जिंकली होती. अलिशा 18 वर्षाची झाल्यानंतर तिला तिच्या वडिलांनी 600cc ची बाईक गिफ्ट केली होती. रोटेक्स कार्टिंग चॅलेंज, नॅशनल सुपरबाईक चॅम्पियनशिप व वोक्सवॅगन नॅशनल पोलो कप देखील पटकावला आहे.

अलिशाला होंडाच्या बाईक्स आवडतात. कारण, त्या छोट्या व कॉम्पॅक्ट असतात. बाईक्ससाठी जापानमधील सुझुकी तर कार कार रेसिंगसाठी इंग्लंडचा सिल्व्हरस्टोन ट्रॅकवर रेसिंग करण्याचे अलिशाचे स्वप्न आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, आपल्या फिटनेसबाबत काय सांगते ग्लॅमरस अलिशा...