औरंगाबाद- भारताची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकीने अंतर्बाह्य नव्या स्वरूपातील अल्टो - ८०० प्लस ही कार बाजारात आणली आहे. मारुतीची ही सर्वात स्वस्त पेट्रोल कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीची किंमत ३.७९ लाख आहे. ही पेट्रोल कार प्रतिलिटर २२.७४ चे मायलेज देते, असा दावा कंपनीने केला असून औरंगाबाद शहरातील डीलर्सकडे ही कार उपलब्ध झाली आहे. याआधी या कारचे लाँचिंग दिल्ली येथे करण्यात आले.
भारतातील सर्वाधिक आवडत्या हॅचबॅक कारमध्ये आता १४ पेक्षा अधिक फायद्यांसह अंतर्गत रचना बदलण्यात आली आहे. डॅशबोर्ड सुसज्ज करण्यात अाला असून बसण्यासाठी जास्त स्पेस देण्यात आला आहे. अंतर्गत रचना ट्रेंडी आणि स्टायलिश असणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या कारचा खप अल्टोपेक्षा जास्त होण्याची कंपनीला आशा आहे. कंपनीच्या मारुती-८०० प्लस या गाडीने ऑटोमाबाइल क्षेत्राचा चेहरा बदलला होता.
ही कार औरंगाबादमधील पगारिया ऑटो आणि ऑटोमोटिव्ह या डीलर्सकडे उपलब्ध असून अधिक माहिती, टेस्ट ड्राइव्ह आणि बुकिंगकरिता ग्राहकांनी मारुतीच्या शोरूमशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.