आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Auto To Launch Bike From Metal Used In INS Vikrant

INS विक्रांतचे पोलाद वितळवून Bajaj ने साकारली न्यू बाइक, 1 Feb ला होईल लॉन्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअ‍रक्राफ्ट कॅरियर 'INS विक्रांत'चे पोलाद वितळवून देशात पहिल्यांदा बजाज ऑटो कंपनीने न्यू बाइकची निर्मिती केली आहे. 'विक्रांत'च्या नावावरून बजाजने नव्या बाइक सीरीजचे नाव 'V' असे ठेवले आहे. येत्या एक फेब्रुवारीला ही या सीरिजमधील पहिली बाइल लॉन्च होणार आहे.

36 वर्षे देशाच्या सीमेचे रक्षण करणारे 'वॉर हीरो' विक्रांतला 2014 मध्ये डिस्मेंटल करण्‍यात आले होते. त्यातून निघालेले मेटल व इतर साहित्याची विक्री झाली होती. Bajaj ने विक्रांतचे मेटल खरेदी करून त्यातून नव्या बाइक ब्रॅंडची निर्मिती केली आहे.

प्रत्येक भारतीय व्यक्तिला अभिमान वाटावा, अशी विक्रांतने कामगिरी केली. यावरुन या बाइक सीरिजचे नाव 'V' (विक्रांत) अक्षराची निवड करण्‍यात आली आहे. बाइकच्या फ्यूल टँकवर 'विक्रांत'चा खास लोगो देखील असणार आहे. 'V' Bajaj सीरिजमधील पहिली बाइक फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होणार आहे. कंपनी 2016 मध्ये या सीरिजमधील 8 बाइक्स बाजारात उतरवणार आहे.

Bajaj ऑटोचे अध्यक्ष (मोटरसायकल बिझनेस) एरिक वॉज यांनी सां‍गितले, की साडेतीन दशकांपासून देशाची सेवा करणार्‍या अजिंक्य विक्रांतची कामगिरी विसरुन चालणार नाही. यासाठी आम्ही विक्रांतचे मेटल खरेदी केले. ते वितळवून Bajaj 'V' बाइकची निीर्मती करण्‍यात आली आहे. ही बाईक देशाच्या मिलेट्री हिस्ट्रीसाठी यादगार ठरणार आहे. कंपनीने अद्याप या बाइकच्या किमतीचा खुलासा केलेला नाही.

अशी असेल Bajaj 'V'
-150cc चे इंजिन
- ड्यूअल रियर शॉक अब्जारवर
- 10 स्पोक अलॉय व्हील्स
- रेट्रो रेसर बाइकसारखी डिझाइन

पुढील स्लाइडवर पाहा, INS विक्रांतचा मेटलपासून निर्मित Bajaj 'V' चे PHOTOS