आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज ऑटो अॅव्हेंजरचे नवे मॉडेल्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाइक्स बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बजाज ऑटोने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नवीन मोटारसायकल बाजारात दाखल केल्या आहेत. दि अॅव्हेंजर स्ट्रीट १५०, क्रुझ २२० आणि स्ट्रीट २२० ची सुरुवात बजाजतर्फे ऑक्टोबरमध्ये नवीन पिढीतील क्रुझर बाइक्स म्हणून करण्यात आली. त्यामुळे लोकांना अनोखा रायडिंग अनुभव मिळाला. यामध्ये मोठा व्हीलबेस अाणि लो स्लंग डिझाइन असल्याने त्या चालवण्यास अत्यंत सोप्या आहेत. तसेच लांबच्या प्रवासात आरामदायक ठरल्या. यात १५० सीसी विभागातही स्ट्रीट फॉरमॅटच्या गाड्याही सुरू करण्यात आल्या. या विभागामुळे आता बाजारपेठेमध्ये १५० सीसी विभागातही आरामदायी क्रुझिंग गाड्याही सुरू झाल्या आहेत. क्रुझ २२० ही गाडी लांबच्या प्रवासासाठी जाणाऱ्यांना, तर स्ट्रीट फॉरमॅट -२२० आणि १५० या गाड्या दररोज कामाला गाडी घेऊन जाणाऱ्या तसेच वीकेंडला दूरच्या प्रवासाला जाणाऱ्यांसाठी योग्य गाड्या आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो....