आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅडव्हेंचर स्पोर्टच्या ग्राहकांसाठी बजाजच्या नव्या पल्सर बाइक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्पोर्टस बाइकच्या चाहत्यांसाठी बजाज ऑटोने पल्सर एएस २०० आणि एएस १५० या दोन मोटारसायकल नुकत्याच बाजारात आणल्या आहेत. एएस श्रेणीच्या माध्यमातून बजाज ऑटोने अॅडव्हेंचर टुरिंगची आवड असलेल्या तरुणाईवर लक्ष केंद्रित केले आहे. यात स्टाइल व कार्यक्षमता यांचा मिलाप करण्यात आला आहे. एएस २०० मध्ये ६ स्पीट ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहे तर एएस १५० मध्ये ५ स्पीड गिअर बॉक्स आहे. दोन्ही बाइक्समध्ये डिजिटल ऑटोमीटर, ट्रिम मीटर,फ्युएल गेज, शिफ्ट लाइट, इंजिन किल स्वीच आहे. मागची चाके मोनोशॉकवर आहेत. क्लच लिव्हर सोपा असल्याने गिअरशिफ्ट सुलभ आहे. पल्सर एएस-२०० ची किंमत ९२,५०० रुपये तर एएस-१५० ची किंमत ७९,००० (एक्स शोरूम दिल्ली) आहे. स्पर्धात्मक किंमत व पैशाचा पूर्ण मोबदला देणा-या या मोटारसायकल अॅडव्हेंचर बायकिंगची आवड असणा-यांसाठी योग्य असल्याचा दावा बजाज ऑटोने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...