Home | Business | Auto | Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

36 किमी मायलेज अन् किंमत फक्त 1.28 लाख, अशी असेल BAJAJ ची QUTE

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2017, 11:50 AM IST

नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस बजाजची एक अशी कार बाजारपेठेत येणार आहे जी भारतीय ऑटो वर्ल्डची संकल्पना बदलणार आ

 • Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

  नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस बजाजची एक अशी कार बाजारपेठेत येणार आहे जी भारतीय ऑटो वर्ल्डची संकल्पना बदलणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही कार सरकारी लालफितीत अडकून पडली होती. पण आता हिचा रस्ता साफ झाला आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवेजने नवीन ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये या quadricycle ला व्हेईकल कॅटेगरीत जागा दिली आहे. या कारला २०१२ च्या दिल्ली ऑटो शोमध्ये RE60 नावाने सादर करण्यात आले होते. ही कार सध्या केवळ निर्यात केली जात आहे. साऊथ ईस्ट देशांमध्ये तिने नाव कमविले आहे. पण भारतात तिला मंजुरी मिळू शकलेली नव्हती.

  पुढील स्लाईडवर वाचा, बजाजच्या या हायमायलेज कारचे फिचर्स... असे आहे आकर्षक मायलेज...

 • Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

  सर्वांत कमी प्रदुषण करणारी कार
  बजाज कंपनीने दावा केला आहे, की ही कंपनीने तयार केलेली आतापर्यंत सर्वांत ग्रीन कार आहे. ही सर्वात कमी सीओ२ उत्सर्जित करते. म्हणजेच ही कमी प्रदुषण करते. हिला २१६.६ सीसीचे इंजिन बसविण्यात आले आहे. ही पेट्रोल बेस कार असली तरी सीएनजी आणि एलपीजी व्हेरायंटही उपलब्ध होणार आहे.

 • Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

  कारचे वजन ४५० किलो

  ७० च्या सर्वाधिक स्पीडने धावणाऱ्या या कारची पीकअप पॉवर १३.२ पीएस आहे. यात वॉटर कल्ड डिजिटल ट्राय स्पार्ट इग्निशन ४ वॉल्व इंजिन आहे. याने परफॉर्मन्स आणि कंट्रोल वाढते. या कारचे वजन ४५० किलो आहे.

 • Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

  इतर कारच्या तुलनेत ३७ टक्के हलकी
  बजाज कंपनीने दावा केला आहे, की सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोणत्याही कारच्या तुलनेत ही कार ३७ टक्के हलकी आहे. वजन कमी असल्याने इंधनाची बचत होते. शहरांचे रोड समोर ठेवून ही डिझाईन करण्यात आली आहे. ही कार कमी जागा घेते तसेच वळवायला सोपी आहे. एक लिटरमध्ये ही कार चक्क ३६ किलोमीटरचे मायलेज देते. इतर कोणत्याही लहान कारच्या तुलनेत ३७ टक्के कमी कार्बन उत्सर्जित करते. एका किलोमीटरवर ही केवळ ६६ ग्राम सीओटू सोडते. या सेगमेंटच्या कारमध्ये हवेत ते सगळे आवश्यक सेफ्टी फिटर्स या कारमध्ये आहेत.

 • Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

  १.२८ लाखांच्या घरात असेल किंमत

  या कारचे टर्निंग रेडियस केवळ ३.५ मीटर आहे. भारतात ही कार कितीला विकली जाईल याची माहिती सध्या देण्यात आलेली नाही. पण ती १.२८ च्या जवळपास असेल असे ऑटो इंडस्ट्रीतील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

 • Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

  राजीव बजाज म्हणाले होते, ही मेक इन इंडिया कार
  गेल्या पाच वर्षांपासून या कारला सरकारने मंजुरी न दिल्याने बजाजचे सीईओ राजीव बजाज प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी नॅसकॉमच्या एका कार्य़क्रमात सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, की ही मेक इन इंडिया कार आहे. तरीही आम्ही गेल्या पाच वर्षांपासून मंजुरीची प्रतिक्षा करती आहोत.

 • Bajaj QUTE, 36 km mileage car, will be launched this year end

  चालवले अभियान
  या कारला गेल्या ५ वर्षांपासून मंजुरी मिळाली नसली तरी विदेशात मात्र तिने धुम केली आहे. ग्राहकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कारला मंजुरी मिळावी यासाठी राजीव बजाज यांनी फ्री क्यूट नावाने अभियान सुरु केले होते. भारतीयांना या अभियानाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले होते. आतापर्यंत ९,०३,७२२ लोकांनी या कारला समर्थन दिले आहे.

Trending