ऑटो डेस्क- बहुचर्चित Dominar (डॉमिनर) बाईक भारतीय रस्त्यावर उतरली आहे. Dominar ही Bajaj ची पहिली सुपरबाईक असून यात 400cc इंजिन बसवले आहे. गेल्या 15 डिसेंबरला Dominar लॉन्च झाली होती. मात्र, सध्या बाईकाला जवळपास दीड महिन्याचा वेटिंग सुरु आहे.
Dominar ची देशातील 22 शहरात विक्री सुरु करण्यात आली आहे. सेल्स सर्व्हिस अपग्रेड होताच डॉमिनर सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बजाज Dominar साठी 30 ते 45 दिवसांची प्रतिक्षा...
Dominar बजाजची आतापर्यंत ही सर्वात वेगवान बाईक आहे. या बाईकमध्ये 373cc चे सिंगल सिलिंडर DTS-i इंजिन बसवले आहे. हे इंजिन 800rpm वर 34.5bhp ऊर्जा आणि 8500rpm वर 35Nm टॉर्क जनरेट करते. Dominar 400 मध्ये स्लिपर क्लचसोबतच 6 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या बाईकचे वजन 182 किलो असून अवघ्या 8.32 सेकंदात ताशी 100 किमीची स्पीड पकडते. Dominarचा टॉप स्पीड ताशी 148 किमी आहे. यातील ड्येअल चॅनल ABS बाईकला सुरक्षित ठेवते. Dominar ची किंमत 1 लाख 36 हजार रुपये आहे. 22 ते 25 जानेवारीपासून ही बाईक शोरूममध्ये उपलब्ध होईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, Bajajची सुपरफास्ट बाईक Dominar चे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)