आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bentley Launches Bentayga A SUV Car In Indian Market

Bentley ने भारतात लॉंच केली पहिली SUV, किंमत 3.85 कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कार निर्माण क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी बेंटलेने भारतीय बाजारपेठेत बेंटायगा ही लग्झरी कार लॉंच केली आहे. तिची दिल्लीतील एक्स-शोरुम किंमत तब्बल 3.85 कोटी रुपये आहे. 600 पीएचपीच्या 6 लिटर टर्बो चार्ज पेट्र्रोल इंजिनची ऊर्जा या कारला देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ चार सेंकदात ही कार 0-60 माईल्स प्रति तासाची गती प्राप्त करु शकते. या कारची सर्वोत्तम गती 301 किलोमीटर प्रति तास अशी आहे.
याबाबत माहिती देताना बेंटलेची डिलर कंपनी एक्सक्लुसिव्ह मोटर्सने सांगितले, की आम्हाला या कारसाठी काही बुकिंग मिळाल्या आहेत. येत्या दोन आठवड्यांपासून कारची डिलिव्हरी सुरु केली जाईल. एकदा ऑर्डर मिळाल्यानंतर पाच-सहा महिन्यांनी डिलिव्हरी दिली जाईल. बेंटायगा ही लिमिटेड एडिशन कार आहे. या वर्षी 2,600 ते 2,700 कार तयार करण्याचे कंपनीचे टार्गेट आहे. त्यानंतर प्रति वर्षी 3,000 कार तयार केल्या जातील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या कारचे आलिशान फोटो.... किंमत आहे 3.85 कोटी रुपये....