Home | Business | Auto | Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer

1 रुपयाच्या डाऊन पेमेंटवर TATA च्या आलिशान कार, सोबत भरघोस डिस्काऊंट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2017, 11:51 AM IST

नवी दिल्ली- चालू वर्षाचा हा अखेरचा महिना असल्याने सर्वच कंपन्या भरघोस डिस्काऊंट देवून माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत.

 • Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer

  नवी दिल्ली- चालू वर्षाचा हा अखेरचा महिना असल्याने सर्वच कंपन्या भरघोस डिस्काऊंट देवून माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार कंपन्याही मागे नाहीत. मारुती सुझुकीने ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देऊ केला आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत टाटा मोटर्सने आकर्षक डिस्काऊंट देत केवळ १ रुपयाच्या डाऊन पेमेंटवर कार विकत घेण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. मेगा ऑफर मॅक्स सेलिब्रेशन कॅम्पेन अंतर्गत ही ऑफर देण्यात आली आहे.

  १ रुपयाचे डाऊन पेमेंट
  टाटा मोटर्सने जी ऑफर बाजारपेठेत आणली आहे त्या अंतर्गत केवळ १ रुपया देऊन कार घरी नेता येणार आहे. ही ऑफर टाटाच्या कोणत्याही मॉडेलवर लागू होणार आहे. यासाठी टाटा मोटर्सने काही बॅंकांसोबत करारही केला आहे. या ऑफरसह काही कारच्या मॉडेल्सवर मोठी सुट देण्यात आली आहे. त्याने ग्राहकांची एक लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे. तसेच शंभर टक्के फंडिंग केल्याने ग्राहकांना कार विकत घेताना जमवावी लागणारी रक्कम लागणार नाही.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, टाटाच्या कोणत्या कारवर किती दिला जात आहे डिस्काऊंट....

 • Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer

  टाटाच्या हेक्सा या मॉडेलवर ७८,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ११.९ लाख रुपये आहे.

   

 • Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer

  टाटाच्या टियागो या मॉडेलवर २६,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ३.२७ लाख रुपये आहे.

   

 • Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer

  टाटाच्या टिगोर या मॉडेलवर ३२,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ४.६३ लाख रुपये आहे.

   

 • Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer

  टाटाच्या झेस्ट या मॉडेलवर ६८,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत ५.३१ लाख रुपये आहे.

   

 • Big discount on Tata cars and only Rs 1 down payment offer

  टाटाच्या स्टॉर्म या मॉडेलवर १,००,००० रुपये डिस्काऊंटची ऑफर आहे. या कारची शोरुम प्रारंभिक किंमत १०.५३ लाख रुपये आहे.

Trending